या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. निघतें की आमचे आरोग्य ह्या पांढन्या पेशांच्या रोगबीजांशी झगडण्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. हे झगडण्याचे काम सर्वतोपरी ह्यांचेच हातून होत नसले तरी, त्याचा बराच भाग ह्या आटपून घेतात. व आजकाल ह्या पांढऱ्या पेशांच्या लागलेल्या शोधाने शास्त्रीयज्ञानांत विलक्षण भर पडली आहे ह्यांत शंका नाही. जेथें कांहीं रोग होण्याचा संभव असतो, किंवा काही इजा झालेली असते, तेथे ह्या पेशांच्या झुंडींच्या झुंडी धांवत जातात. फार तर काय, पण एखादा बारीक ओरखडा आंगावर पडला तर ह्या तेथे येऊन साफसूफ करून नवीन कातडी तयार करून ती तेथें बेमालूम बसवून देतात. आतां ह्या प्राण्यांच्या बीजरूपी पेशांच्या योगाने प्राणी गीत असतांना जी मजेदार रूपांतरें होतात ती सांगून हे प्रकरण पुरें करूं. गर्भात बीजरूपी प्राणी माशापासून तों ( मनुष्यप्राण्याचे बीज असल्यास) मनुष्यापावेतों किंवा तो प्राणी ज्या जातीचा असेल त्या जातीपर्यंत सर्व प्राण्यांची तो रूपें घेतो. व हे प्रथम, बीज ह्मणजे एकादी मेंदूपेशी असते अथवा मेंदू ज्या पेशांचा बनलेला असतो त्या जातीची असते. नंतर गर्भात गेल्यावर दुसऱ्या महि. न्यापासून हिचे रूपांतर होऊ लागते. दुसऱ्या महिन्याच्या पूर्वी पृष्ठवंशविशिष्ट प्राण्यांची जी सर्व साधारण ठेवण असते, त्यासारखाच कांहीं अंशीं तो प्राणी होतो. दुसऱ्या महिन्यास तो माशासारखा होतो. अर्थात माशापेक्षां जे उच्च प्रतीचे प्राणी, त्यांच्याच गर्भास ही गोष्ट लागू आहे. माशांचा गर्भ असेल तर त्याची तेथेच पूर्णता होईल. पक्ष्यांस ह्या स्थितींत माशांची आकृतीच केवळ नव्हे, तर माशांना जशी दोहींकडे पंखे असतात तशीच त्यांनाही असतात. सशाचे तर ह्याहूनही चमत्कारिक असते. ह्मणजे त्याला ह्याशिवाय माशासारखेच कल्ले असून शिवाय तो पाण्याने भरलेल्या एका लहानशा पिशवीत त्या वेळी राहतो व पोहतोही. त्याचा श्वासोच्छास ह्या वेळी मत्स्याप्रमाणेच पाण्यांतून चालला पाहिजे ह्मणून ईश्वराने पाण्याच्या पिशवीची योजना केलेली असते. असो. ह्या स्थितीतून निघाल्यावर तिसन्या महिन्यास कासवाप्रमाणे होतो. ह्मणजे बहुतेक वेळ पाण्यात राहतो. तरी पाण्याशिवाय वर राहूनही त्यास श्वासोच्छास करतां येतो.