या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १९०१. ह्याचप्रमाणे चवथ्या महिन्यांत तो पक्षी होऊन राहतो. मग अथीत त्यास पाण्याची वगैरे कांहींएक जरूर लागत नाही. नंतर तो पांचव्या महिन्यांत दंतयुक्त प्राण्यासारखा बनतो. व मग रवंथ करणान्यांच्या वर्गात प्रमोशन मिळाल्यावर सातव्या व आठव्या महिन्यांत चतुर्भुज (ह्मणजे माकडाप्रमाणे, कारण त्याचे दोन्ही पाय हातासारखेच असतात) होऊन नवव्या महिन्यांत पूर्ण मनुष्य होतो. हे वरील गर्भातील प्राण्याचे चरित्र वाचून आमच्या वाचकांस दशावतारांची आठवण झाल्यावांचून राहणार नाही. दाही अवतार जरी वरील क्रमाने नसले तरी त्यांपैकी पहिले तीन किंवा चार इतके बरोबर मिळतात की आपल्या पूर्वजांच्या बुद्धीविषयीं कौतुक वाटल्यावांचून राहील असा कोण बरे आहे ? हे उघडच आहे की, गर्भात ज्याप्रमाणे रूपांतराचा क्रम आहे, त्याच क्रमाने जवळ जवळ सष्टीमध्येही प्राण्याची उपपत्ति झालेली आहे. पृथ्वी जेव्हां निवली तेव्हां प्रथम जलमय होती व त्या वेळी मत्स्य किंवा इतर जलचरांशिवाय कोणी प्राणी नव्हते. नंतर जसजशी पाण्यांतून जमीन वर येऊ लागली तसतसे जमिनीवरील प्राणी उत्पन्न झाले; व प्रथमतः कांहीं निमें जमिनीवर पानम जलांत राहणारे प्राणी उत्पन्न झाले. व सर्वात शेवटी माकड व मनुष्य ही अवतरली; व हाच क्रम गर्भातही दृष्टीस पडतो. पिंडी तेच ब्रह्मांडी हा न्याय येथे किती सुरेख रीतीने लागू पडतो बरें! ह्यावरून उत्क्रम अथवा Evolution theory हे तत्त्व आमच्या पूर्वजांस माहीत होत; व अशाच क्रमाने सृष्टि उत्पन्न झाली असे ते सांगतात. त्याचप्रमाणे परमेश्वराने तशी कल्पना करतांच सृष्टि उत्पन्न झाली. तेव्हां मत्स्य उत्पन्न होण्यास प्रथमतः परमेश्वरास कल्पनेने तरी मत्स्य बनलेच पाहिजे. जीवतत्त्व हेच जर परमेश्वरापासून आलेले, तर पहिला जो मत्स्य तो ईश्वराचा अवतारच ह्मणण्यास हरकत नाही. असो. तर ह्यावरून येवढेच दिसून येते की आमाला जन्मास येण्यापूर्वी निदान ( ८४००००० योनीतून नसले तरी) ह्या वर सांगितलेल्या १ परंतु ८४ लक्ष तरी योनीतून जात नसूं हे कशावरून? आह्मांला स्पष्ट निरनिराळ्या अशा ८ च जरी दिसल्या तरी प्रत्येक क्षणी आमची एक एक योनी बदलत नसेल कशावरून?