या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. आठ नऊ योनीतून जावे लागते. आणि अवतार हे केवळ परमेश्वरासच ध्यावे लागत नसून आपणही ते तसेच घेतों किंवा प्रेमाने आह्मी या बाबतींत परमेश्वराचे अनुकरण करितों असेंही झटल्यास चालेल.ralia वनस्पतींचा संसार. Time मुकाम पहिला. com विषयारंभ. संसाराचा व्याप केवळ एका मनुष्यप्राण्याच्याच मागे आहे असे नाही. तर तो प्रत्येक प्राण्याच्या, प्रत्येक वनस्पतीच्या, किंबहुना प्रत्येक पदार्थमात्राच्या सुद्धा मागे लागलेला आहे झटले तरी सुद्धां चालेल. बीज उत्पन्न होणे, रुजणे, प्राणाचा अंकुर फुटणे, जन्मास येणे, खाणे, पिणे, उद्योगधंदा करणे, लग्न लावणे, प्रजोत्पत्ति करणे, व अखेर मरणेंकिंवा मूळ रूपाला जाऊन पोचणे हा सर्व संसार होय. इतकेच नव्हे तर प्राण गेल्यानंतर देहाकडून काय कार्य घडते, तो कशाच्या कामी लागतो, इत्यादि गोष्टींचा सुद्धां समावेश संसार ह्या शब्दांतच होता. ह्यावरून प्रत्येकाच्या संसाराचें जर एक एक यथातथ्य चित्र तयार केले, तर ते किती शोभायमान व मनोरम दिसेल बरें? परंतु मनुष्याची दृष्टि बहुधा संकुचितच असते. तो फक्त आपल्या जातिबांधवांचा ससार मात्र पहात असतो. इतर प्राणिमात्रांच्या संसाराकडे त्याचे मुळींच लक्ष्य नसते मटले तरी चालेल. गाई, मशी, कुत्री, मांजरें, इत्यादि त्याच्या निकट सान्निध्याला असणारे जे पशु त्यांचे संसार थोड्याबहुत अंशाने तरी डोळ्यांसमोर येत असल्यामुळे त्यांविषयी थोडी तरी कल्पना त्याच्या मनात येते. परंतु वाघ, सिंह अशा सारक्या हिंसक व वन्य प्राण्यांचा किंवा कृमिकीटकांसारख्या क्षुद्र जीवांच्या संसाराची आमांस कांहींच माहिती नसते मटले तरी चालेल. परंतु सांप्रतकाळी कित्येक पुस्तकांतून मुंग्या, माशा अशांची काही थोडींबहुत वर्णने प्रसिद्ध झाली आहेत. ही त्यांतल्या त्यांत मोठी संतोषाची गोष्ट होय. कारण, त्यांच्यावरून त्या क्षुद्र जंतूंच्या संसाराची थोड़ी तरी कल्पना मनांत येते. मुंग्यांमध्ये आपल्याप्रमाणेच शहरे आहेत;