या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

7 अंक ५ वा. मे १९०१. ११३ आपल्याप्रमाणेच घोडेस्वार आहेत; आपल्याप्रमाणेच राजा राणी आहेत; त्यांच्यांत शूर आहेत; त्यांच्यांत युद्धे आहेत; त्यांच्यांत धनी आहेत; त्यांच्यांत चाकर आहेत; त्यांच्यांत सडका आहेत; त्यांच्यांत पूल आहेत; त्यांच्यांत गायी आहेत; त्यांच्यांत गवळी आहेत; त्यांच्यांत धारा काढतात; इत्यादि गोष्टी ऐकिल्या ह्मणजे आपणांस किती बरें आनंद होतो? परंतु वनस्पतींचा संसार ह्याहूनही चित्ताकर्षक व मनोरम आहे. तो इतका की, त्याचे पुस्तक आपण एक वेळ वाचूं लागलों तर तें संपेपर्यंत हातांतून खाली सुद्धा ठेववणार नाही. वनस्पती ह्या, प्राण्यांप्रमाणेच सजीव आहेत; त्यांना तोंडे आहेत; त्यांना शिरा आहेत; त्यांना पक्वाशय आहे; त्यांना इंद्रियज्ञान आहे; त्या जेवतात; त्या खातात; त्या निजतात; त्या लग्ने करतात; त्या मुलांचे संगोपन करतात; इत्यादि गोष्टी आपल्यास समजल्या तर आपणांस किती बरें संतोष होईल ? आणि आपण किती बरें आश्चर्यचकित व्हाल? ह्याकरितां ह्या लेखामध्ये वनस्पतींचा पंक्षिप्त इतिहास, त्यांची उत्पत्ति व वाढ ह्यांचा विचार करण्याचे योजिलं आहे. ह्यांत गगनचुंबित ताड, माड व अत्यंत विस्तृत अशा वडपिंपळापासून तों तहत भिंतीवर व झाडांवर वाढणाऱ्या यःकश्चित् शेवाळी, फणसांब्यापर्यंत जेवढ्या ह्मणून वनस्पति आहेत, तेवढ्या सायांचा समावेश केला जाईल. त्यांची प्रथम उत्पत्ति कशी झाली, आणि त्यांच्यापासून उत्तरोत्तर आमच्या डोळ्यांस दृष्टीस पडणारी झाडे, झुडपें, वनस्पति, वेल, आंबे, फणस, कुत्र्यांची मुतें इत्यादि नानाप्रकारचे आकार व वृक्षांच्या असंख्य जाती कशा निर्माण झाल्या, तेंही दाखविण्याचा प्रयत्न करूं. मणजे एखाद्या राष्ट्राची पहिली उत्पत्ति देऊन त्याच्या मूळारंभींच्या साध्या खरूपापासून तों तें वैभवास चढून त्याला कार्यकारी खरूप येईपर्यंत त्याच्या इतिहासाचे जसें वर्णन करतात, त्याप्रमाणेच आमीही हा वनस्पतींचा मनोरम इतिहास सुलभ भाषेनें सांगणार आहों. वनस्पति ह्या सजीव आहेत; ही गोष्ट स्पष्ट रीतीने सिद्ध होईल असें प्रतिपादन प्रथम करावयाचें. आझाला व तुह्मांला जसें इंद्रियज्ञान आहे, त्याचप्रमाणे वनस्पतींसही आहे. आपणांप्रमाणेच त्यांनाही पूर्वीची दोन आईबापे असून त्यांच्या मिश्र बीजापासूनच त्यांचा जन्म होतो. तसेंच वनस्पती ह्या भक्ष्य खाऊनच आपली उपजीविका करतात; त्यांना