या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें.. तोंडे आहेत; त्यांना पक्वाशय आहेत; त्यांच्या योगाने त्या भक्ष्य सेवन करतात; पचवितात; आणि त्यांच्याच योगाने त्यांना पुष्टि येते. ही तोंडे, आणि हे पक्वाशय पानांच्या रूपाने असतात; आणि सभोंवार पसरलेल्या वातावरणांतून कार्बानिक आसिडचे परमाणू इतस्ततः तरंगत असलेले ओढून घेतात. त्यांना असंख्य ओंठ असतात, त्यांच्या साह्याने ते परमाणू शोषून घेतात आणि त्यांच्यापासून निघणारे सत्त्व में कार्बान तो सेवन करतात. कार्बान हेच त्यांचे मुख्य भक्ष्य असून वनस्पतिसृष्टीचे घटकावयवही तेच आहे. वनस्पती पाणीही प्राशन करतात. पण त्यांच्या प्राशनाचा प्रकार मात्र आमच्याहून फार भिन्न आहे. त्यांची खाण्याची तोंडे आणि पिण्याची तोंडे निरनिराळी असतात. पाण्याहून किंचित् घनद्रव्य जो कार्बान तो त्या वातावरणांतून पर्णमुखाने सेवन करतात; आणि त्यांचे पातळ भक्ष्य में पाणी, ते त्या जमिनीच्या आंत असलेल्या आपल्या मुळ्यांनी व मुळांच्या केसरांनी शोषून घेतात. कार्बानाला आमीं अधिक घनद्रव्य असें झटले ह्याचे कारण, वनस्पतीं तील लांकडांपैकी पुष्कळ अंश, कठीण व चिवट भाग बहुतेक अंशी ह्याच द्रव्याने बनलेला असतो. त्यामध्ये इतर तत्त्वे फारच थोडी अ. सून ती फारशी महत्वाची नसतात. हा कार्बान वनस्पती भक्षण करितात, तेव्हां तो जरी घनस्थितीत नसतो-कार्बानिक आसिड ह्या ग्यासरूपानेच असतो, तरी तो पुढे घनरूपच बनतो. हाच विषय पुढे आह्मी विस्तारानें व तपशीलवार सांगतांना त्याचे अधिक विवरण करूं. तूर्त इतकेंच ध्यानात ठेवले झणजे बस्स; की वनस्पती ह्या सजीव आहेत; व त्या थेट आपणांप्रमाणेच खातात व पितात. । वनस्पतींमध्ये लग्ने आहेत, व त्या लग्ने करतात. इतकेंच नव्हे तर आपल्याप्रमाणेच त्या प्रजोत्पत्ती करून कुटुंबाची वृद्धि करतात. त्यांच्या मध्ये आपल्याप्रमाणेच स्त्री व पुरुष, किंवा नर व मादी हे दोन भेद आहेत. कांहीं जातींच्या वनस्पतींमध्ये नर व मादी अगदी वेगवेगळी असते. काहींमध्ये एकाच बुडख्यावर दोघे असतात. कांहीं जातींमध्ये एकाच फुलांमध्ये सुद्धा नरमादी असते. कारण, फुले हेच वनस्पतींच्या पुनरुत्पत्तीचे भाग होत. त्यांची नवें झाड उत्पन्न करण्याची जी बीजें, ती उत्पत्ति करण्याकरितांच तेथे असतात. त्यांच्याच योगाने प्रत्येक