या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १९०१. जात कायम राहते. उच्चप्रतीच्या वनस्पतींचा जो पुरुषाचा भाग असतो त्याला पुंकेसर असें ह्मणतात. त्यापासून पिवळी बुकी खाली पडते. तिलाच पराग असें नांव आहे. ह्याच परागाच्या आंगीं कोवळे बीज उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असते. तसेंच उच्चजातींच्या वनस्पतींचा जो स्त्रीचा भाग असतो, त्याला स्त्रीकेसर असें ह्मणतात. ह्यामध्ये बारिक बारिक अशा गेंददार सूक्ष्म गुठळ्यांचा झुबका असतो. तो आपल्याच फुलांतील किंवा दुसऱ्या झाडाच्या फुलांतील पुंकेसरापासून पराग घेऊन आपला झुबका फुगवून त्याचीच फलद्रूप बीजें तयार करतो. ह्मणजे प्राण्यांच्या आंड्याचे आणि त्यांचे फारच सादृश्य आहे. ही बोंडे पक्कदशेस आली झणजे तें स्त्रीकेसर यौवनदशेत येते. त्यालाच आह्मी फळ असे ह्मणतों. ते कधी कधी द्राक्ष, करवंद, ह्यासारखे गोड व रसाळ असते. पण बहुतकरून अशा प्रकारची बोंडे खसखशीप्रमाणे सुकींच असतात. तथापि प्राण्यापेक्षां वनस्पतींची गोष्ट एका बाबतींत तर फारच भिन्न आहे. ती ही की, वनस्पती ह्या जमिनीमध्ये एकाच ठिकाणी डांबलल्या असतात. ह्यामुळे पक्षी, फुलपांखरें, खारी, सरड ह्यांना जसें आपआपल्या नराकडे जाता येते, तसे ह्यांस अर्थातच जातां येत नाही. झणून त्या कामी त्यांस दुसऱ्यावर अवलंबून राहणे भाग पडते. कारण, ते काम त्यांच्या स्वतःच्याने होत नाही. ह्मणजे ह्याचा स्पष्टार्थ इतकाच का, ह्यांच्यांतील लग्ने जुळवून देण्याला कोणीतरी एक उपाध्यायासारखा तिन्हाईत लागतो. हे लग्नाचे किंवा स्त्रीपुंकेसराच्या संयोगाचे काम दुसऱ्या कोणाकडून करून घेतात. गवत, पंदे इत्यादि कितीएक विविक्षित वनस्पतींतील पराग कधी कधीं वायु हा आपल्या प्रवाहाबरोबर एका फुलांतून दुसऱ्या फुलांत वाहून नेतो. अशा वनस्पतींचे देंठ, आपल्यांतील पुंकेसरें वाऱ्यावर मोकळी सोडतात. आणि त्यांचा पराग अहण करणारे स्त्रीकेसर ज्यांत असतात, त्यांचे देंठ स्त्रीकेसरांचे लांब लांब तंतु, त्यांच्या जवळून जाणारे जनकशक्तीचे परमाणू-अर्थात्-पनाग-ओढून घेण्यासाठी पसरून ठेवतात. पण बहुतेक वनस्पतींच्या जातीमध्ये हे काम करणारे भुंग, मधुमक्षिका इत्यादि प्राणी किंवा की