या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. टकच असतात. उदाहरणार्थ, गुलाब, जाई, जुई, कमळे, इत्यादि आपली उद्याने सुशोभित करणाऱ्या सुंदर वनस्पति ह्या वर्गात मोडतात. STORI पढें चालू)..भाग की मी पुस्तकपरीक्षा. लायक बन शक्तिप्रभावपद्यमाला-अथवा – पद्यात्मक सप्तशती कथानकसार-हें पुस्तक रा. रा. गणेश एकनाथ कुळकर्णी-पांगेरकर ह्यांही तयार करून त्याचा थोडथोडा भाग कोल्हापूर येथील 'दक्षिणवृत्त' पत्रामध्ये छापून प्रसिद्ध केला आहे. त्यास ३ वर्षे झाली. सदरहू पुस्तकावर अभिप्राय देण्याची आमचेकडून फारच हयगय झाली, याबद्दल पुस्तककास दिलगिरी दर्शवून आज त्याबद्दल दोन शब्द लिहितों, संगीत व काव्यग्रंथावर वेळोवेळी अभिप्राय देतांना त्याविषयींची आमची मते व होतकरू ग्रंथकारांस सूचना आह्मीं केलेल्याच आहेत. ह्यास्तव ज्या कवीला आपले काव्य उत्तरोत्तर अधिकाधिक रंगारूपास यावे अशी इच्छा असेल, त्यान त्या पुनः पुनः अवलोकन कराव्यात. ह्मणजे त्यांस बरेंच सहाय होईल. कोणतेही काव्य घेतले, तरी त्याला दोन प्रधान अंगे असतात. एक छंदांग आणि दुसरें अर्थीग, इच्छित तालसुरांत किंवा रसास अनुकूल अशा छंदांत किंवा वृत्तांत अक्षरांची जुळणी करणे हे छंदांग होय; व भाषासौष्ठव, अनुप्रास, अलंकार इत्यादिकांनी श्रोत्यांच्या मनावर तो तो रस उठवून मनाची वृत्ति जागृत करणे हे अर्थांग होय. ही दोन्ही अंगें जीत निर्दोष आढळतात, तीच कविता अत्युत्कृष्ट, ही दोन्ही अंगें परस्परांस साह्यकारी आहेत हे काही सांगणे नकोच. पण त्यांतल्या त्यांत छंदांग हे गौण व अर्थांग हे अत्यंत श्रेष्ठ असे मानतात. ह्याचे कारण उघडच आहे की, छंदांग उत्तमप्रकारें साधावयाला थोडीशी बुद्धिमत्ता असली तरी पुरे होते. त्यांत फक्त व्हस्वदीघे अक्षर, अक्षरगण व मात्रागण, आणि फार तर रसास अनुकूल असा छंद इतकेच साधावयाचे असते. पण अर्थागाची गोष्ट तशी नाही. त्यांत जेवढी जेवढी झणून बुद्धिमत्ता खर्च करावी तेवढी तेवढी थोडीच होते. आणि तिच्या मानानेच तिचा मनःप्रवृत्तीवर विकास होत असतो. अर्थात् कोमल व कठोर शब्द, अर्थस्वारस्य, यमकें व अनुप्रास; उपमा, उत्प्रेक्षा व अलंकार, आणि अखेर सरलता, प्रसाद, इत्यादि अनेक, केवळ ईश्वरी देणगीच्या गोष्टी साधावयाला लागतात. ।