या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १९०१.. आणि तें काम फार कठीण असते. आणि त्यांतील गुणावरून काव्याचे सरसत्त्व किंवा नीरसत्त्व ठरवावयाचे असते. ह्यास्तव प्रस्तुत "शक्तिप्रभावपद्यमाले" तील ह्या दोन्ही अंगांचा विचार करूं या झणजे झाले. आता हाच विचार दोन्हीही अपूर्तीच होणार हे उघड आहे. ह्यास्तव त्यांपैकी काही काही भागांचें दिग्दर्शन करतों, हणजे बहुतेक काव्याचे स्वरूप लक्ष्यात येईल. II अर्थांग हे कठिण असल्यामुळे त्यांत कांहीं कमज्यास्त प्रमाणाने चुका होणे साहजिकच आहे. पण छंदांग तर सोपे आणि नियमबद्ध आहेना ? पण त्यांत सुद्धा आलीकडचे-नव्हे काही मराठी पूर्वकालीन कवी सुद्धा अशा काही घोडचुका करून ठेवतात की सांगतां सोय नाही. ह्या पहिल्या व सोप्या छंदांगांविषयींच जर ही अवस्था, तर मग अर्थीगाची संभावना काय विचारावी ? तिचा मासला आमच्या कोकिळांत अनेक वेळां येऊन गेलेलाच आहे. आणि काही शिलकीत आहे तो तर अपूर्वच आहे. असो. प्रस्तुत पुस्तकासंबंधानें ही एक मोठी आनंदाची गोष्ट दिसून येते की, त्यांत अशा विपरीत व हास्यास्पद चुका बहतेक नाहींतच झटले तरी चालेल. नवीन व होतकरू कवीने हे छंदांग प्रथम निर्दोष होण्यासाठी आर्या, श्लोक, साक्या, दिंड्या, अशी वृत्तात्मक पद्ये केलेली बरी. कारण, ती अक्षरगणांच्या नियमांनी बद्ध असल्यामुळे त्यांत अक्षरगणांचा कमजास्तपणा खपत नाही. आणि त्यामुळे निदोष व सरळ छंदरचना करण्याची संवय लागते. नवीन कवीने संगीत चालीवर पदें वगैरे करण्याच्या भरीस पडणे हे काव्यगुणास बरेंच विघातक होतें असे आमचे मत आहे. ह्याचे कारण, ते छंद तालबद्ध असल्यामुळे, व त्यांस व्हस्वदीर्घाची फारशी कडक बंधने नसल्यामुळे, व्हस्वदीर्घाक्षरांची कशीही जवळ जवळ रचना केली तरी, ती अक्षरें ओढूनताणून तालांत आणतां येतात, आणि नवीन होतकरू कवींचे छंदांगाकडे बरेंच दुर्लक्ष्य होते, आणि त्यांत गौणता दिसू गुंफलेली आहे. ह्मणजे संगीत पदें, कटाव वगैरे असून शिवाय आर्या, साक्या, लोक, दिंड्या इत्यादि वृत्तपद्येही आहेत. आणि त्यांत कोठे दोषही आढळग्यांत येत नाही. इतकें झटले झणजे प्रस्तुत शक्तिप्रभावपद्यमालेचे छंदांग