या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें, चांगल्या प्रकारचे बनले आहे, हे निराळे सांगावयास नकोच. आतां अर्थीगाचा विचार, "शक्तिप्रभावपद्यमाला" ह्या नांवावरूनच हिच्यामध्ये शक्तीचें-आदिमायेचेंजगदंबेचें अवतारचरित्र असावें हे कळून येते. सप्तशतींतील देवीच्या अवतारचरित्रांचें हीत थोडक्यांत वर्णन केले आहे. ह्यांत एकंदर तीन चरित्र आहेत. पहिल्या चरित्रांत सुरथ राजाची कथा असून तींत जगदंबेनें अवतार घेऊन मधु, कैटभनामक दैत्यांचा वध केला आहे; दुसऱ्या चरित्रांत महिषासुराचा वध केला आहे; व तिसऱ्या चरित्रांत शुंभनिशुभनामक दैत्यांचा वध केला आहे. प्रत्येक चरित्राचे सार थोडक्यांत वर्णिले आहे. पहिले पद्य 'पंचतुंड नररुंडमालधर' या चालीवर केलेले असून त्यांत "श्रीजगदंबा जयदा" अशी आद्याक्षरें साधली आहेत. बहुतेक पद्यांतील शब्दरचना, वर्णन, भाषा, भाषाशैली सरळ आहे. कित्येक पये बरीच सरस साधली आहेत. उदाहरणार्थ: पद. 'नोहे नारी ही चंचलवल्ली' ह्या चालीवर. वाहे नृपती मनिं चिंता भारी । कैसी मन्नगरी ॥ दुर्दैवाने राज्या मुकलों, आप्तादिकही झाले दूरी ॥ ध्रु० ॥ शौर्य समरंगणिं जय दे मजला । भय दे शत्रूला ॥ ऐसा शूरमणी मत्सचिव भला । अरिकरिं सांपडला ॥ Pा समयीं उपयोगा येइल मजला । ह्मणुनी सांचविला ॥ द्रव्यनिधी तो मम दुर्दैवें दिधला रिपुच्या की आज करीं ॥ १॥ । हे पद्य साधे व सरळ आहे; आणि त्यांत फारसें अशुद्ध असे काही नाही हे खरें, तथापि 'भारी' नगरी;' 'मजला' 'शत्रूला;' असली यमके आणण, व 'दरी' 'समरंगणिं' इत्यादिरूपें करणे ही गौण प्रतीचीच होत. AIRE श्लोक. (कामदा.) TETTE कोण तूं असा या महावनीं । दुःख वाहसी काय कारणी॥ सांग बा तुझें नांव कायरे । सोडलेसि का आप्तसोयरे ॥ १ ॥ हा श्लोक जसा साधा तसा सरळही आहे. परंतु 'यथा बाधति बाधते' ह्या न्यायाप्रमाणे 'कारणी' शब्दाने त्यांत बरेच विरजण घातले आहे. असो. पण खालचें पद्य निर्दोष असून रसिकाच्या मनोवृत्तीला बरेंच जागृत करणारे आहे: