या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १९०१. मी वैश्य असें धनिककुली जन्म लाभला । स्वमुखाने स्वापमान काय कथं तुला ॥ ध्रु० ॥ जे स्त्रीसुत आप्त सकल मिळुनियां जनीं ।। सर्वस्वा हरुनि मला धाडिलें वनीं ॥ केलें म्यां पालन तें नाणिलें मनीं ॥ परि मन्मति तन्मोहें होत व्याकुला ॥ १ ॥ ह्या पद्यावरून प्रस्तुत कुळकर्णी ह्यांच्या आंगीं नैसर्गिक कवित्त्वशक्ति असल्याची चांगलीच साक्ष पटते. खालील आर्याही चांगल्यांत गणण्यासारखी आहे: येउनि ससैन्य महिषं, क्रोधे धांवोनि देखिली देवी ॥ झाला सिद्ध भिडाया, दिव्यद्युतिच्या सर्व शलभ तेंवी ॥१॥ दुसऱ्या चरित्रांतील कटावही फार चांगला साधला आहे. परंतु तो फार मोठा असल्याने येथे घेता येत नाही. आतां सरतेशेवटी तिसऱ्या चरित्रांतील एक सुंदर पद दाखल करून हा काव्यगुणाचा भाग आटपतो. हे पद ह्मणजे देवानी आदिशक्तीचा केलेला स्तव होय. तो असा आहे: पद. ( मला शांतमुनि भासतो-या चालीवर.) वनीं स्तविति देवी शुभा स्मरुनि तीतें । सकल सुर येउनी हिमनगी ते॥ध्र०॥ झणति देवी नमो प्रकृति भद्रे नमो ऋद्धि सिद्धी शिवे विष्णु माये ॥ बुद्धि निद्रापरे दिक्प्रभे स्थिरचरे, निर्मले तुज नमो कृष्णपीते ॥ १ ॥ शांतिश्रद्धे नमो भ्रांतिरुद्रे नमो, आदिमध्यांतके चित्स्वरूपे ॥ तुष्टिरूपाघरे सर्व भूतांतरे कोमले तुज नमो उष्णशीते ॥ २॥ असुरिं या सुरगणां गांजिलें बहुपरी, ह्मणुनियां त्वत्पदा शरण आलों ॥ स्वजनपरिपालके तारि दीनां अह्मां, येउनी त्वरित कारुण्यसरिते ॥ ३॥ हे पद वास्तविक पाहतां उत्तमांतच मोडण्यासारखे आहे. तरी जाड घातलेल्या शब्दांच्या ठिकाणी कसकशा ठेचा लागतात, हे चाणाक्ष वाचकांच्या ल. क्ष्यांत येईलच. येथपर्यंत गुणासंबंधाने विचार झाला. आतां दोषासंबंधानेही थो डेसे लिहूं.