या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. प्रस्तुत पद्यमालेमध्ये अत्यंत विपरीत व केवळ हास्यास्पद अशी दोषस्थळे नाहीत हे पूर्वी सांगितलेच आहे. तेव्हां तशा प्रकारची पये पुन्हा देण्याची आवश्यकताही नाही, तथापि:- HTTERPRETRON दिडी. “त्वरें बैसुनि भूपाल निजतुरंगीं।" ह्यांत 'तुरंगी' असा सप्तम्यंत शब्द अशा प्रसंगी वापरण्याचा परिपाठ नाही. घोड्यावर बसावयाचे, घोड्याच्या आंत बसावयाचें नाहीं ! साकीमध्ये एक प्रास 'गांजियले अहे' असा आणणे, आणि दुसऱ्या चरणाच्या शेवटी 'निष्ठुरता न बरी हे' असा प्रास आणणे, झणजे ते कर्णकटु होतात. निदान अंत्याक्षर व उपांत्यस्वर येवढी तरी सम असल्याशिवाय पद्य कानास गोड लागत नाही. तसेंच 'भयगलित' 'त्रयलोक' 'कुचयुगी इंदुनिभाती' 'अनलज तें नयनिं विराजे' 'वधिले नख वदनें धांवतां' इत्यादि शब्द व वाक्ये कांही अशुद्ध व काही अप रिचित अशी होत. ह्यास्तव ती वयं केली पाहिजेत. कISTRA वरील सर्व विवेचनावरून सदरहू शक्ति प्रभावपद्यमाला' हे काव्य चांगल्यांपैकी आहे हे दिसून येईलच. ह्मणजे त्यांत दोषाचा भाग फारच कमी असून गुणाचा भाग पुष्कळ अधिक आहे. ह्यास्तव हे काव्य रसिक जनांस व देव्युपासकांस मान्य होईल अशी आशा वाटते. व रा. रा. गणेश एकनाथ कुळकर्णी हे आपला असाच प्रयत्न पुढे ठेवतील तर त्यांच्या कविता बण्याच नांवालौ किकास येण्यासारख्या होतील. मात्र त्यांनी असा नीरस व पौराणिक विषय न निवडतां सद्यःस्थितीच्या अभिरुचीप्रमाणे मनोवृत्तीस जागृति देणारा विषय निवडीत जावा, येवढी सूचना करणे इष्ट दिसतें. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.