या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १५] [अं०६ लोकोत्तर चमत्कार. दाढीवाली बाई--इसाऊ !! VAIDYA व्याकरणाचे जसे नियम असतात; राष्ट्राचे जसे कायदे असतात; त्याचप्रमाणे सृष्टिचक्रालाही परमेश्वराने नियम बांधून ठेवलेले आहेत. त्याच नियमांच्या सुतांत हे सृष्टीचे रहाटगाडगें चाललेले असते. दगड आकाशांत फेकला तर तो जमिनीवर पडावा; रात्र संपली की पुन्हां सूर्याचा उदय व्हावा; अमावास्या आली की चंद्र लुप्त व्हावा; वोकाल आला की पाऊस पडावा; पाण्याचा ओघ नेहेमी सखल भागाकडेच वाहत जावा; ह्या नियमांत कधीच बदल होत नाही. आजपर्यंत कधी