या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. एक दिवस काही कारणाने सूर्याला उदयाचलावर येववलें नाही, असे घडल्याचा मागला दाखला नाही, व पुढे तरी तो कधी येईल असेंही ह्मणण्याचे धारिष्ट होत नाही. त्याचप्रमाणे प्राण्याची गोष्ट. सजातीय स्त्रीपुरुषांच्या संगमानें सजातीय प्राणीच उत्पन्न होतो; त्यांत चूक नाही. मशीला कधी वासरूं किंवा शिंगरूं व्हावयाचें नाही किंवा हत्तीणीला कधीं उंदीर, ससा किंवा मूल व्हावयाचें नाही. त्याचप्रमाणे शरीररचनेची गोष्ट आहे. पुरुष वयांत आला ह्मणजे त्यास दाढीमिशा यावयाच्या; व स्त्री वयांत आली झणजे तिच्या स्तनाची वृद्धि व्हावयाची. हाही अबाधित नियम आजपर्यंत चालत आलेला आहे. व तो नियम आमच्या इतका हाडी खिळलेला आहे की, ह्यांत अदलाबदल होईल हे कोणाच्या कधीं ध्यानी मनी व स्वप्नीही येत नाही. कारण, बायकांना दाढीमिशा आल्या अशी उदाहरणे कोणी व कधी ऐकलेली आहेत ? तरी व्याकरणाच्या नियमाला जसे अपवाद असतात; राष्ट्राचे कायदेही कधी कधी जसे मोडलेले दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे परमेश्वराच्या नियमांतही बदल झालेला दृष्टीस पडतो. पण तो अतिशय विरळा आढळून येतो. ह्मणूनच त्यांस लोकोत्तर चमत्कार असें नांव आहे. अशा लोकोत्तर चमत्काराचें जनांस आश्चर्य व कौतुक वाटावें हे साहजिकच आहे. ह्मणून आज आमी एका दाढीमिशीवाल्या बाईची सचित्र माहिती देत आहों.. पूर्वी एकदां केरळकोकिळामध्ये केसाळ माणसें व दाढीवाल्या बायकांची माहिती आह्मी दिलेलीच आहे. पण तींत ही अपूर्वबाई नव्हती. त्यांत ज्या केसाळ मनुष्यांची माहिती दिली होती, त्या मनुघ्यांच्या साऱ्या आंगभरच केस असल्यामुळे ती काही अंशी माकडासारखी दिसत. अर्थात् ती विद्रूप असल्यामुळे त्यांच्यांत विलक्षण चमत्कार असा वाटत नसे. पण आज आमी शिरोभागी ज्या बाईचे चित्र दिले आहे, व पुढे थोडीशी माहिती देणार आहों. ती बाई फारच सुस्वरूप असून तिला एखाद्या केसाळ पुरुषाप्रमाणे ढळढळीत दाढीमिशा आहेत! ह्यास्तव हीस पाहून आमच्या वाचकांस पहिल्याहूनही अधिक आश्चर्य वाटेल ह्यांत शंका नाही.