या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. १२३ पाश्चात्य देशांत अशी एक चाल आहे की, एखादी चमत्कारिक वस्तु दृष्टीस पडली झणजे ती ठिकठिकाणी प्रदर्शन करून त्यांत दाखवावयाची, आणि पैसे उकळावयाचे. तो त्यांचा एक धंदाच असतो. अतिशय उंच मनुष्य, अतिशय लहान मनुष्य, दोन डोक्यांचा मनुष्य, असे काही सांपडले की, तिकडे तो एक रोजगारच सुरू होतो. त्या'प्रमाणे दाढीमिशा आलेल्या बायकाही प्रदर्शनांत दाखवित असतात. ह्याप्रमाणे तिकडे पुष्कळ बायका दाखविण्यांत आल्या. परंतु त्या सर्वांत ह्या बाईचे उदाहरण फारच आश्चर्यकारक आहे. ह्या बाईचे मूळचे नांव । मिस आनी जोन्स एलियट आहे. तरी तिला इसाऊबाई असेंच ह्मणतात. हिचा जन्म इ. स. १८६५ मध्ये व्हर्जीनियांतील म्यारन् स्मिथ काउंटीमध्ये झाला. हिची आईबा किंवा बहिणभावंडे ह्यांपैकी कोणासच साधारण लोकांपेक्षा अधिक केंस नाहीत. पण ही बाई उपजली तेव्हाच तिला साधारणपणे चांगल्या दिसेशा मिशा होत्या. तरी, त्या वेळी लोकास इतके आश्चर्य वाटले नाही. पण ती दोन वर्षांची झाल्यानंतर मात्र ता पृथ्वीवर एक अद्भत प्राणी ह्मणूनच परमेश्वराने पाठविली आहे, अशी सर्वांची खात्री झाली. कारण, तितक्या अवधींत तिची दाढी व मिशा चांगल्याच वाढल्या. तेव्हां लगेच तिला प्रदर्शनांत दाखविण्याचा सुरवात केली. त्यामुळे सर्व युरोपखंडांत तिचा मोठा जयजयकार झाला. ती आतां छान बायको आहे. ती दिसण्यांत फारच पाणीदार व नाजुक सत. तिची चामडी अगदी तुळतुळीत व मृद आहे. तिच्या सवागाची ठेवण, एखाद्या श्रीमान व राजबिंड्या बायकोप्रमाणे दिसते. तिची आगकांती तर इतकी मनमोहक आहे की, तिचे वर्णन करणेही केवळ अशक्य होईल. तिचे केस काळसर उदी रंगाचे आहेत. केवढा चमत्कार हा! ह्यावरून तुकारामाचे अनुभविक वाक्य किती बरें खरें वाटते? "अशक्य तें काय तुह्मां नारायणा."