या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. राममत्स्यसंवाद. श्लोक. कापट्ये जनकात्मजा दशमुखें नेतां हरोनी बळें, शोकव्याकुल धैर्यपर्वत ढळे पोळे वियोगानळें । भार्येते मग दक्षिणेत जइं तो शोधावया चालला, सौमित्रासह रामचंद्र भगवान् पंपासरा पातला ॥ १ ॥ शोभे शांत सुरम्य तें सर भलें तोयें सुधेच्या परी, पढ़ें फुल्ल अहा ! किती विलसती तज्जीवनाभ्यंतरीं । ऐसें तें रमणीय सत्सर सुखा सीताधवा फार दे, खेदातें विसरे असें मग तदा तो लक्ष्मणा वदे ॥२॥ लक्ष्मणा ! रुचिर सत्सर हे महा, माझिया सुखवि खिन्नमना पहा । खच्छ यजल असें अमृतासम, सेवितां वरिति की विलया श्रम ॥ ३ ॥ नीरमध्यगत ही कमले किती, फुल्ल शोभति जयांस नसे मिती । गंधलुब्ध मधुपव्रज सेविती, तन्मधुप्रचुर सत्सुख पावती ॥ ४ ॥ गंधयुक्त सकलावन कारण, श्रांतपांथजनतापनिवारण । मंद मंद विचरे सुखवू जनां, हा हिमानिल सुखप्रद मन्मना ॥ ५ ॥ कोकिला करिति मंजुल गायन, जाय ते परिसुनी मन वेधुन । । गान हे न गमतें हृदयांतला, शुद्धभाव करिती स्फुट आपला ! ॥ ६॥ सन्मनुष्यमन जेवि सुनिर्मल, हे प्रसन्न मज तेंवि गमें स्थल । वैरता दिसुनि ये लव ना मला, येथ शांति वसते परमोज्वला ॥७॥ मानिती जन जयास महा ठक, साधु तो गमतसे मजला बक । खेळतो जलिं सुखें खपदें कशी, टाकितो करुनि हा बघ चौकशी ॥८॥ की जलस्थ लघुजीवशिरीं पद, त्या पडोनि झणि होइल मृत्युद । हा विचार करुनी मनिं वागतो, नीतिमंत बक हा मज वाटतो! ॥९॥ रामचंद्र वदतां अनुजा असें, वर्तले नवल एक तिथे असे । राघवोक्ति परिसोनि जलीं सुखें, यापरी वचन मीन वदे मुखें ॥ १० ॥