या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. १२९ "पूर्वपुण्य उदया अजि आले, की तुझें चरणदर्शन झालें!। तूं समर्थ अससी रघुराया ! या जडास भवमुक्त कराया !॥ ११ ॥ राघवा ! अससि तूं सकलज्ञ, दीन मीन लघु मी जरि अज्ञ । बोलितों तुजपुढे परि धीट, ऐक बा धरिं न तूं मनिं वीट ॥ १२ ॥ टाकितो हळु हळू स्वपदातें, पाहुनी गणिसि साधु बकातें । त्याचिया परि मनांतिल कावा, केंवि शुद्ध हृदयीं तव यावा? ॥ १३ ॥ आपणासमचि सर्व जगांत, शुद्धधी, गणिसि तूं खमनांत । नाचलोक पण या जगतांत, फार फार सदया ! वसतात ! ॥१४॥ साधुता वरति दाखवि मोठी, वासना धरि मनी बहु खोटी । वाह्यरूप बघुनीच भुलावें, काय सजन तयास गणावें ? ॥ १६ ॥ हा तसाच बक हिंसक नीच, पापभीति, नय या न मुळीच । मौन ये न जंव दृष्टिपथांत, हा बसे कुटिल तोंवरि शांत ॥ १६ ॥ चा बके टपुनि अल्प दिनांत, मत्कुलास धरिलें उदरांत । एकटाच उरलों बघ आहे, पूर्वपुण्य मणुनी तुज पाहे ॥ १७ ॥ एक तोच सहवासिगुणांसी, जाणतों सकल तत्सहवासी। ज्यास भीति बघतां मज दाटे, तोच धार्मिक तुला बक वाटे ॥ १८ ॥ कपट न तुज ठावें पूर्ण कारुण्यसिंधो । सरल हृदय सर्वी मानिसी दीनबंधो ॥ परि बकसम लोकी नीच आहेत फार । टपुनि फसविती ते की न चित्ता विचार ॥ १९ ॥ यापरी परिसुनी झषवैखरी, खोंचला रघुकुलोत्तम अंतरीं । काय तो मग तया जलगा वदे, हर्ष भाषण तुझें मज फार दे ॥ २० ॥ बोललास समयोचित तूं झषा, मान देइन न मी मग त्या कसा? । राघवोत्तम असें तई बोलुनी, आठवी निजसतीप्रत तो मनीं ॥ २१ ॥ खेद पूर्ण तई तन्मन जाहलें, लक्ष्मणे सकल कारण जाणिलें । योजुनी सविनये मृदु वैखरी, बंधुचे सुमति सांत्वन तो करी ॥ २२ ॥