या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. कर्तव्यातें समजुनि मनी होउनी सावधान TY पंपातीर्थी अनुजसह तो सारुनी स्नानपान | MP त्या मीनातें सदय हृदयें उद्धरोनी निघाला कौसल्येचा तनय सतिचा शोध लावावयाला ॥ २३ ॥ में 'कल्लोळकर'. केरळकोकिळाचा सत्कार. केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय ह्मणती ॥ शिवपूजा शिवासि पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥ तैसे पूजिती आह्मां संत । पूजा घेतो भगवंत ॥ आह्मी किंकर संतांचे दास । संत पदवी नको आह्मांस ॥२॥ तुकारामकोणतीही व्यक्ति घ्या, की पदार्थ घ्या; त्यामध्ये गुण आणि दोष ह्यांचे मिश्रण हे असावयाचेच. निखालस निर्दोष अशी वस्तु जगामध्ये एकही सांपडणें नाही. परंतु त्यांतल्या त्यांत दोषाचा अंश थोडा आणि गुणांचा अंश अधिक असला किंवा लोकांच्या प्रत्ययास आला, तरी त्याचे सुदैवच समजले पाहिजे. व त्याचीच गणना चांगल्यांत करावयाची. अशा प्रकारे सत्कीर्तीची पाळी आली तरी ती भाग्याची किंवा ईश्वरकृपेचीच वेळा समजली पाहिजे. ही वेळा कित्येक वेळां खसामर्थ्याने किंवा आत्मगुणानेंच प्राप्त होते. किंवा कधी कधी दुसन्याच्या सौजन्यानेही प्राप्त होते. कारण, कित्येक असे उदार महात्मे असतात की, ते दुसऱ्याच्या दोषाकडे मुळी कधीं नजरच फेंकित नाहीत. किंवा त्यांची दृष्टि तिकडे कधी वळतच नाही. आणि अत्यल्प गुणाचा सुद्धा ते फार मोठा गौरव करतात. हा त्यांचा थोरपणा आहे. असो. असे प्रसंग थोड्याबहुत प्रमाणाने केरळकोकिळास वारंवार येतात. तेव्हां जे गृहस्थ कोकिळाचा येवढा गौरव करतात, त्यांचे उपकार फेडणे तर कठीणच, ह्याकरितां त्यांजविषयी दोन आभारदर्शक शब्द लि