या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

92wm3-hy अंक १० वा. अक्टोबर १८९८. २२३ हे सर्व पाहिल्यावर जेन ग्रेचा बाप घाबऱ्या घाबऱ्या तिच्या महालांत गेला आणि ह्मणाला “झाले. सर्वस्वी घर बुडालें! तुझा लंदनच्या राणीपणाचा अवतार संपला. तूं आतां इंग्लंदची राणी नव्हेस येवढेच नव्हे, तर तुजवर मोठे अरिष्ट कोसळणार!!" त्यास शांत वृत्तीने त्या मुलीने उत्तर दिले की “ह्यांत विशेष तें काय? ही गोष्ट ठरलेलीच होती; व ती मी जाणूनही पण होते. मी केवळ तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आणि आईच्या आज्ञेस मान दिला. मी मनामध्ये पक्की खूण गांठ बांधून ठेवली होती की, मी माझ्या मनाविरुद्ध, केवळ तुमच्या इच्छेनें व सत्तेने जरी राज्यसूत्र हाती घेतले आहे, तरी सुद्धां मजवर तोहमत येईल. असो. ईश्वराची इच्छा!" हे संभाषण पुरे होतें न होते तोच किल्ल्यामध्ये लोक घुसले. आणि सारी धुमश्चक्री सुरू झाली. सरकारी ग्यारिसनचे लोक येऊन त्यांनी लेडी जेन ग्रेला व तिच्या भ्रताराला पकडून चतुर्भुज केले, आणि परस्परांची ताटतूट करून राजकीय तुरुंगांत नेऊन कोंडून टाकलें!! मेरी राणीस मोठ्या समारभान सिंहासनावर बसवून आनंदाच्या जयघोषाने लंदन शहरच नव्हे, तर सारा इंग्लंद देश दणाणून गेला. आणि उभयतां कारस्थानी ड्यूकांची जिकडे तिकडे नाचक्की होऊन फटफजिती उडाला. शिक्के, मोर्तब, द्वाही, ध्वज, सर्व मेरी राणीच्या नांवाने सुरू होऊन जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. ह्या नव्या राज्यक्रांतीची स्थिरस्थावर झाल्यानंतर नोवेंबर महिन्यांत लेडी जेन ग्रे व तिचा नवरा ह्या उभयतांवरील आरोपाची चौकशी न्यायकोर्टापुढें प्रसिद्धपणे सुरू झाला. तीत उभयतांवरही राजदोडाचा गुन्हा शाबित होतो असे ठरले व दहांताची शिक्षा कायम यादी तत्काल 'लेडी जेन ग्रे, व तिचा भ्रतार ह्या उभयतांचे ता० १२ फेब्रुवारी रोजी शिरच्छेद करण्यांत येतील' असेंही कोर्टाने सनावलें!! त्या वेळी दुःखपर्वताच्या शिखरावरून त्या पतिपत्नींनी परस्परांकडे शेवटचे पाहून घेतले! इतके झाल तरी, जेन ग्रेचा धीर ह्मणून सुटला नाहीं! केवढें आश्चर्य हे! राणी मेरी ही रोमनक्याथालिक धर्माने जखडलेली होती; आणि