या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. रस्त्याप्रमाणे त्यांनी एका स्त्रीला फुसलावून आपल्या बिहाडी आणले. आणि रात्रौ खाणे, दारू पिणे, गाणे, बजावणे सुरू केले. अनाथ बिचारी बाई ! आपल्या बरोबर सारी गोड बोलतात ह्मणून तीही त्या आनंदांतच मग्न झाली होती. आपली शंभर वर्षे भरली, आपल्या गळ्याला तांत लागणार, हे त्या बिचारीच्या ध्यानीमनीही नव्हते. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास ह्यांच्या खोलीत बरीच मोठी गडबड व आरडाओरड झाल्याची ऐकून कांहीं बि-हाडांतील लोक जागे झाले. एकानें दुसऱ्यास उठीव, दुसऱ्याने तिसऱ्यास उठीव असें होतां होतां बराच जमाव जमला; व त्यांनी कोठून शब्द येतो व कसला दंगा आहे हैं पाहण्यासाठी हेअरच्या व बर्कच्या दारास आंगच्या कुलपांतून आंतील थोडेसें दिसण्यासारखी फट होती, तींतून डोकावून पाहिले. तों बकेची बायको एका स्त्रीच्या तोंडांत व्हिस्की ओतीत आहे येवढेच त्यांच्या दृष्टीस पडले. पुन्हा मंडळीची एकत्र बसून कांही वाटाघाट चालली तों, जिवाच्या आकांताची एक आरोळी ऐकू आली. त्याची त्यांनी विशेष चौकशी केली नाही, परंतु एका बि-हाडकरूने जाऊन पोलिसचौकीत वर्दी मात्र दिली. परंतु पुन्हा येऊन पहातो तों जिकडे तिकडे सामसूम झाले. तेव्हां हा सर्व दारूच्या अमलांतला तंटा आहे, येवढीच कल्पना करून सारी मंडळी आपआपल्या ठिकाणी निजावयास गेली. परंतु सकाळी सर्वांस संशय उत्पन्न झाला. ह्मणून त्यांनी पोलिसास बोलावून आणले. ह्या काळवरूप्यांच्या बि-हाडाचा झाडाही घेतला. पण त्यामध्ये काहीएक निघालें नाहीं, किंवा रक्त वगैरेही कोठे सांडलें संवरलेलें दृष्टीस पडले नाही. तरी मंडळीमध्ये पुन्हा रात्रीच्या गोष्टीची चर्चा सुरू झाली. होतां होतां एका बि-हाडवाल्याने अशी पैज मारली की, त्या बाईचे प्रेत ह्यांच्या बि-हाडांत असलेच पाहिजे. असे होतांच सर्व मंडळी पोलिसासह पुन्हा त्यांच्या बिन्हाडांत शिरली, आणि बारकाईने एक एक वस्तु तपासू लागली. तेथें एक पेटी बंद केलेली होती. तींत प्रेत असेल अशाविषयी कोणाचीच कल्पना नव्हती. तथापि उगाच फोडून पहाण्याची कल्पना येऊन ती तत्काल फोडण्यांत आली. तेव्हां ह्या यमदूतांचा अस्सल माल बाहेर पडला !! मग काय