या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. १२७ हून तरी त्यांच्या उपकारभारांतून थोडें उत्तीर्ण होणें हें कोकिळा, कर्तव्य होय, हे काही सांगणे नको. इतकेच नव्हे, तर त्याविषयी कोणताच उल्लेख न करणे ह्मणजे कृतघ्नतेच्या दोषास पात्र होणे आहे. आतां हे दोन शब्दही लिहावयाला वेळच्यावेळी सवड होत नाही, ह्याबद्दल त्यांस दिलगिरी वाटते. तथापि ह्या विलंबाबद्दल क्षमा करतील या आशेवर तो कांहीं कांहीं सद्गृहस्थांबद्दल किंवा निस्सीम भक्तांबद्दल दोन शब्द लिहित आहे. १ श्रेष्ठी क्षेमराज श्रीकृष्णदास "श्रीवेंकटेश्वर समाचार" स्टीमप्रसचे मालक-विस्तृत, अत्यंत सुव्यवस्थित, नेमस्त व चित्रबद्ध असें मुंबईस हिंदुस्थानी भाषेत निघणारे वर्तमानपत्र "श्रीवेंकटेश्वरसमाचार" सवविश्रुतच आहे. "श्रीवेंकटेश्वर" छापखाना फार मोठा आहे. त्यांत इजिनावर ६ व हाताचे ६ असे बारा प्रेस सारखे चालत असतात. शिवाय टाइपांची फौंडरी वगैरेंचा कारखाना त्यांतच जोडलेला आहे. ह्या प्रेसमध्ये हिंदस्थानी व संस्कृत ग्रंथ छापण्याचे काम सदासर्वदा सुरू असते. येथे उत्तमोत्तम अनेक ग्रंथ तयार झालेले आहेत. ह्या प्रेसचे व वर्तमानपत्राचे मालक श्रेष्ठी क्षेमराज श्रीकृष्णदास हे होत. हे मोठे धर्मात्मे, उदार, खधर्मनिष्ठ अत्यंत सुशील व गुणज्ञ असे आहेत. ह्याजकडून 'केरळकोकिळा'स 'श्रीवेंकटेशसमाचार' आज कितीएक वर्षे नियमित मोबदला किंवा भेट येत असतो, व कोकिळही त्यांजकडे जात असतो. तो ते स्वतः वाचतात इतकेच नव्हे, तर त्यांतील कित्येक चित्रे व उतारेही ते आपल्या पत्रांत घेतात. ह्यामुळे केरळकोकिळाशी त्यांचा अत्यंत परिचय आहे. येवढेच नव्हे, तर त्याजवर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. त्यांनी मुद्दाम एक पत्र पाठवून "श्रीवेंकटेश्वरसमाचारा'वर अभिप्राय देण्याविषयी विनंति केली होती. पण तो देण्यास आजपर्यंत सवड झाली नाही याबद्दल दिलगिरी वाटते. तथापि आतां 'कलमबहाद्दरांस शेलापागोटें देण्याचा समारंभ लौकरच सुरू होणारा असल्यामुळे 'समाचारा'चा सत्कारही त्यांतच होईल. असो. कोकिळ भराऱ्या मारीत मारीत मुंबईच्या जवळ जवळ आला आहे हे पाहून त्यांनी आमांस एक पत्र पाठवून प्रत्यक्ष भेटीची इच्छा दर्शविली. त्या पत्रांत ते ह्मणतात:---