या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ . केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. "महाशय ! आपल्या सौजन्याबद्दल कौतुक वाटून परमानंद होणे साहजिक आहे. आपल्या दर्शनाकरितां आझी फार उत्सुक आहों. आमच्या यंत्रालयांतील काही पुस्तकें आपल्यास भेट करण्याची बहुत दिवसांपासून आमची इच्छा आहे. परंतु आपलें रहाण्याचे स्थळ निश्चित नसल्यामुळे तसा योग आला नाही याबद्दल दिलगिरी वाटते. आपण महाराष्ट्रभाषेवर केलेले परिश्रम व आपल्या सदुपदेशामृताचा दिव्य लाभ सर्वत्र होत आहे, याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. आपली लेखनपटता, काव्यनैपुण्य, गांभीर्यादि विचारशक्ति सर्वत्र महशूर आहे. आणि त्याबद्दल आमालाही मोठा अभिमान वाटतो. आपण महाराष्ट्रभाषेची पुस्तकें मुद्रित करण्याबद्दल जो अनुग्रह केला आहे, तो फार वर्णनीय आहे. काय करावें? आजपयंत कोणीही मराठी भाषेची पुस्तकें छापण्याबद्दल अशी सूचना केली नाही. त्यामुळे तसा योग आला नाही. तरी जशी आपली इच्छा असेल त्याप्रमाणे "श्रीवेंकटेश्वर भगवान्" समर्थ आहे. त्याच्याच कृत पेनें सर्व कांहीं चालले आहे. आतां आपण कोणकोणते ग्रंथ तयार केले आहां, ते पाहिजे तर पाठवून द्यावेत, अथवा आपण स्वतः येथे आल्यास अतीव उत्तम होईल. कारण, आपण केलेल्या कृतीची समजूत जशी आपण कराल, तशी दुसऱ्याकडून होणे कठीण आहे. इ. इ." - आपला, कृपाकांक्षी खेमराज श्रीकृष्णदास. ह्या पत्राप्रमाणे सवड आलेली पाहून आमीही त्यांस भेटावयास गेलो. त्या वेळी त्यांनी जे अगत्य दाखविलें, व सन्मान केला, तो फारच अवणनीय होता. त्यांनी आमांस निवडक निवडक असे संस्कृत व हिंदुस्थानी ग्रंथ सुमारे ५०।१५ परमादरानें नजर केले. इतकेच नव्हे, तर त्याशिवाय त्यांनी आपला क्याटलॉग आह्मांस देऊन आणखी अशी विनंति करून ठेवली की आपली ग्रंथाभिरुचि कशी आहे तें मला माहित नाही. आपल्यास कोणकोणत्या विषयांचे ग्रंथ आवडतात ते समजण्याला मार्ग नाही. याकरितां ह्या क्याटलॉगांतील जे जे ग्रंथ आणखी आपणांस पाहिजे असतील व पसंत पडतील तें अवश्य असेल काही चाहिजे तर पाठक कारण,