या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९ अंक ६ वा. जून १९०१. कळवावें. ह्मणजे मी ते ताबडतोब आपणांकडे पाठवून देईन." ह्या सर्व ग्रंथांची पोंच आजच्या अंकासोबत दिलेलीच आहे. त्यावरून ते किती उपयोगी, व केवढ्या मोलाचे आहेत हे वाचकांस कळून येईलच. नंतर शेटसाहेब ह्यांनी एक मोठा थोरला हार, तुरे, गजरे वगैरे आणवून आमचा फारच मोठा सत्कार केला; व अति आग्रहाने बरीच मोठी रकमही दिली. ह्याबद्दल शेटसाहेबांचे कितीही आभार मानले तरी थोडेच होणार. परंतु आमांस ग्रंथ दिल्याबद्दल जो आनंद झाला आहे तो सर्वात अधिक आहे हे सांगणे नकोच. अशा प्रकार आमच्या लायब्ररीस शेटसाहेबांनी विशेष भूषणीभूत केल्याबद्दल आजन्म आह्मी शेटसाहेबांचे ऋणी आहों. नंतर शेटसाहेबांनी विनंति केल्यावरून "चंद्रलोकची सफर" ह्या नांवाचे २३ प्रकरणांचें एक सबंध पुस्तक लिहून तयार होते ते त्यांस छापण्यासाठी आमी दिले आहे. ते आतां लौकरच प्रसिद्ध होऊन वाचकांस मिळेल. ह्याची ११२ प्रकरणे पूर्वी केरळकोकिळा'मध्ये येऊन गेलेलीच आहेत. त्यावरून तो विषय किती महत्वाचा, मनोरम, उपयुक्त व अद्भुत रसाने परिपूर्ण आहे ह्याचा वाचकांस अनुभव आहेच. तो थोडथोडा कोकिळांतनच दिला असता, तर २३ वषीत तरी सपता किंवा नाही ह्याचा वानवाच आहे. ह्याकरितां इतका कालपयत वाचकांस तिष्ठत ठेवण्यापेक्षां सबंध पुस्तकच त्यांच्या नजरेसमोर लौकर १३० तर बरे, असें वाटून आली तेंच पुस्तक शेटींकडे प्रथम दिले म. व उत्तरोत्तर 'श्रीवेंकटेश्वर समाचारा'चा व 'कोकिळा'चा संबंध हतर होऊन अन्योन्य संबंधानें कांहीतरी लोकोपयोगी कार्य घडो अशी परमेश्वरापाशी प्रार्थना आहे. वनस्पतींचा संसार. मुक्काम पहिला. (मागील अंकावरून पुढे चालू.) , अशा जातींच्या वनस्पतींची पुष्पं फार मनोहर रंगीबेरंगी पाकळ्यांची व मनोल्हादक आकाराची असतात. अशी की कोणत्याही प्राण्याचें,