या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. विशेषेकरून शृंगादिकांचे चित्त त्यांकडे वेधावें. अशा प्रकारे ह्यांची लग्ने जुळविण्याचे काम जे उपाध्ये-अर्थात् गादि कीटक–मनोभावें करतात, त्यांस त्या वनस्पती, दक्षिणा किंवा पगारही देतात. तो कोणता ? तर आपल्या पुष्पांतील एक मधाचा बिंदु ! ह्मणूनच भृग, मधमाशा वगैरे प्राणी 'दक्षिणार्थ भिक्षुकगण पळत सूटला' ह्या किर्लोस्करांच्या संगीतोक्तीप्रमाणे उड्या घेत त्यांच्याकडे जातात. दुसऱ्याचे बीजारोपणाचे काम करण्याची त्यांना जरी इच्छा नसते; वनस्पती ह्या आपणांकडून विवाहमंगल कार्य करून घेतात ह्यांची त्यांस कल्पनाही नसते; तरी त्यांच्या पुष्पांच्या सौंदर्याने त्यांस मोह पडतो; त्यांच्या मधुबिंदूला ते लुब्ध होतात; आणि त्या मायाजालांतच त्यांच्याकडून ह्या फुलांतील फलोत्पादक बीज, त्या फुलांत नेण्याचे काम सहजीं होऊन जाते. किंवा वनस्पति ह्या अशा युक्तिप्रयुक्तीने हे आपले काम त्यांच्याकडून करून घेतात ह्मटले तरी चालेल. ह्या संसारचित्रामध्ये फुले आणि भ्रमर, व वनस्पतींचा लग्नसमारंभ, ह्याच्या इतका मनोरम भाग कोणताच. नाही. हा मनोरंजक व चमत्कारिक वनस्पतींचा लग्नविधि पुढील विवेचनांत विस्ताराने सांगण्यांत येईल. तसेच वनस्पतीच्या पुष्पाने गर्भधारणा केली, आणि त्यापासून फलाचे जनन झालें, ह्मणजे त्यांची ती अपत्ये जगभर पसरणे हेच त्यांना अत्यंत फायद्याचे कलम असते. त्यांची फळे किंवा बीजे त्यांच्याच तळाशीं पडून राहतील, तर त्यांचे मुळीच पोषण होणार नाही. ह्याकरितां त्या विशिष्ट वनस्पतींची पोषक द्रव्ये ज्या जमिनीमध्ये विपुल भरलेली असतील, अशा सुपीक जमिनीमध्येच ती पडली पाहिजेत. त्याची अधिक कारणे पुढे सांगण्यांत येतील. नाहीतर, जेथें बीज पडावयाचे त्याच्या भोवतालची जमीन इतर झाडाझुडपांनी इतकी गजबजलेली असेल की, त्या बिचाऱ्याला उगवून वर येण्यालाच वाव मिळणार नाही. ह्याकरितां वनस्पति ह्या आपले बीज, इतस्ततः पसरण्याकरितां नानाप्रकारच्या चातुर्याच्या युक्ति योजितात. काही आपल्या फळांच्या किंवा बियांच्या शेंड्यावर पिसें लावतात. रुई, कापशी, कवसकुल्या, शेवरी इत्यादि झाडे आपल्या बियांच्या सभोंवतीं पिसें लावल्याप्रमाणे कापूस लावून त्यांस हवेत तरंगत सोडतात. ह्मणजे त्या आपोआपच