या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. वायूच्या झपाट्याबरोबर नव्या सुपीक व सोयीवार जमिनीत जाऊन पडतात. दुसरी कितीएक करवंद, द्राक्ष, नारिंग इत्यादिकांची झाडें पशुपक्ष्यांस लालुच दाखविण्याकरितां आपल्या फळामध्ये गोड व मृदु रसभरित गीर भरून ठेवतात, आणि त्याने कोणत्या तरी प्राण्यास मोह घालून आपले काम साधतात. ह्या सर्व उदाहरणांत फळ किंवा बाहेरचे कवच जरी खाण्याजोगें मिष्ट व मृद असते तरी, आंतील मुख्य बीज इतके कठीण व ताठर असते की, तें प्राण्याच्या कोठ्यांत गेले तरी त्याचे पचन होऊं नये. किंवा कित्येकामध्ये वरचेंच कवच जाड असते. जसे कवठ, बेलफल, नारळ इत्यादि. आणखी आढळणारी असंख्य उदाहरणे त्या त्या स्थली सादर करूं. तूर्त आपण इतकेंच ध्यानात ठेवावयाचे की, वनस्पति ह्या आपल्या मुलांना निर्वाहाकरितां दूर दूर भागी पाठवितात; आणि पुष्कळ तर त्यांच्या सोयीकरितां त्यांना जन्म भर दूरच ठेवित असतात. येवढा वेळपर्यंत केलेल्या विवेचनांत आह्मी विशेषेकरून उच्च प्रतीच्या चनस्पतीविषयीं व पुष्कळ अंशी भूवनस्पतींविषयींच वर्णन केले. कारण, प्राण्याप्रमाणेच वनस्पतींमध्येही त्यांच्या उच्च नीच, लहानथोर, अशा असख्य जाती आहेत, हे विसरता कामा नये. त्यांच्यामध्ये उंच व नाच हा भेद आहे, त्या अर्थी त्यांच्या प्रतींविषयीं व वर्गाविषयीं आपणास विचार केला पाहिजे. कांही मोठ्या आहेत, कांहीं लहान आ काहा वार्षिक आहेत; कांहीं बारमाही आहेत. असें कां? कांहीं जादा रुक्ष माळावरच वाढतात; तर कांहीं नुसत्या पाण्याच्या डोहावपतरगतात. कित्येकांना कमळासारखे मृद व नाजुक देंठ असतात; तर कित्येकांना शिसवी खैरासारखें जाड व कठीण खोड असत. त का? आपल्या मनांत प्रथमच येते की, अशा ह्या एकमेकांपासून भिन्न का असाव्यात? आणि त्यांची वाढ होते तीही निरनिराळ्या प्रकाराने होत ती कशामुळे? सारांश काय, की आपण गुलाब तो ह्याच्यासारखा आहे, व कोबीचा कांदा आहे तो त्याच्यासारखा आहे, असें ह्मणूनच समाधान मानून घेतां उपयोग नाही. तर हे निरनिराळे आकार त्यांस कसे प्राप्त झाले, ह्याचा विचार करावयाचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण कमळे कशी वाढतात, त्यांचा विचार केला पाहिजे. व त्यांची