या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. उत्त्पत्ति, वाढ व त्यांच्यांतील गुणधर्माच्या चमत्कारांचे सूक्ष्मदृष्टीने अवलोकन केले पाहिजे. तर आतां आमी पुढे जे वनस्पतींच्या संसाराचे चित्र उभे करणार, त्यांतील विचारांच्या मुद्यांचे पुन्हा एकदां सिंहावलोकन करूं या. वनस्पति हे सजीव पदार्थ आहेत. त्या पानांनी भक्ष्य खातात, व मुळांनी पाणी पितात. त्या वातावरणांतून कार्बान शोषून घेतात, आणि जमिनीतून पाणी सेवन करतात. आणि त्यांच्याच साह्याने आपल्या शरिराची इमारत चढवित जातात. वनस्पतींमध्ये लग्ने असून त्यांचा एकप्रकारचा विधि असतो. त्यांच्यामध्ये नेहेमीं नर व मादी हे दोन भेद असतात. त्यांच्या आईबापांपासून त्यांचे बीज उत्पन्न झालेले असते. वनस्पति ह्या अनेक जातींच्या असून त्या कशा झाल्या, त्याचा विचारही क्रमाक्रमानेच करूं. वनस्पति ह्या समुद्रावर व जमिनीवरही उगवतात. आणि कांहीं विवक्षित जाग्यांत विवक्षित वनस्पतींच्याच जाती असतात. त्यांच्यांत आपल्या फुलापासून बीजोत्पत्ति करून । ण्याचे प्रकार अनेक आहेत; आपली मुलें पुढे बाह्य प्रदेशांत पाठवून देण्याचेही प्रकार अनेक आहेत; व त्यांना वागविण्याच्या तन्हाही अनेक आहेत. प्राण्यांप्रमाणेच त्यांच्यामध्ये उच्च व नीच जाती असतात. पुढे आह्मी जो विषय, विस्ताराने प्रतिपादन करणार, त्यांतील मुख्य मुख्य मुद्दे इतकेच. राजयोग. उत्तरार्ध. योगसूत्रे-भाग १ ला. (अंक ३ वरून पुढे चालू ). ह्यालाच प्राण असे मटलेले आहे. परंतु प्राण ह्मणजेच कांहीं श्वासोच्छास नव्हे. तर ब्रह्मांडांत असलेल्या चैतन्यशक्तीला प्राण हे नांव आहे. ब्रह्मांडांमध्ये जी जी वस्तु ह्मणून आपणांस दृष्टीस पडते, जी जी वस्तु हालचाल करते, व कार्य करते, किंवा जी सजीव असते, ते