या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. १३३ तें प्राणाचें व्यक्तखरूप होय. ब्रह्मांडामध्ये चैतन्य ह्मणून जेवढें प्रगट झालेले आहे, त्याला प्राण असें ह्मणतात. कल्प सुरू होण्यापूर्वी हा प्राण बहुतेक अचेतन स्थितींतच राहिलेला असतो. आणि कल्पाला प्रारंभ झाला की, हा प्राणही व्यक्तस्वरूपाने बाहेर पडू लागतो. हाच प्राणशक्तीच्या रूपाने किंवा चैतन्याच्या रूपाने बाहेर पडूं लागतो. किंवा मनुष्यप्राण्यामध्ये अथवा पशूमध्ये ज्ञानतंतूंत प्रवाहरूपाने प्रगट होतो. आणि तोच प्राण विचारादिरूपानेही व्यक्त स्वरूपास येतो. सर्व ब्रह्मांड हे प्राणाचे व आकाशाचे मिश्रण आहे. मनुष्याचे शरीरही तसेच. आपल्यास दृश्य आणि स्पर्य वाटणारे सर्व घटकावयव आपल्याला आकाशापासून प्राप्त होतात, आणि निरनिराळ्या प्रकारच्या सवशक्ति आपणांस प्राणापासून प्राप्त होतात. आतां हा जो प्राण तो वाहर सोडणे व आंत दाबून ठेवणे ह्यालाच प्राणायाम असें ह्मणतात. योगशास्त्राचा जनक जो पतंजली, तो प्राणायामाविषयी फारशी तपशिलवार माहिती देत नाही. परंतु त्याच्या पश्चात् योग्यांना ह्या प्राणायामामध्ये अनेक नव्या व चमत्कारिक गोष्टी आढळून आल्यामुळे, त्याना त्याचे एक मोठे शास्त्रच तयार केले आहे. अनेक मागापैकी पतजलीने प्रतिपादन केलेला एक मार्ग असल्यामुळे त्याने त्याला विशेष महत्व दिलेले नाही. त्याने येवढेच सांगितले आहे की, आपण सहज त्या श्वास बाहेर सोडावा, व पुन्हां आंत घेऊन काही वेळ तेथेच ठवावा ह्मणजे बस्स्. तेवढ्याने मन बरेंच शांत होईल. परंतु त्याच्या मागून ह्या विषयाचा पुष्कळ ऊहापोह होऊन 'प्राणायाम' नांवाचें एक वगळच शास्त्र झाले आहे. ह्या पाठीमागून झालेल्या योग्यांनी काय काय मटले आहे, त्यांपैकी थोडेसें मी येथे सांगतो. त्यांतील थोडासा भाग मी पूर्वी सांगितलाच आहे. तथापि तो आपल्या मनांत नीट ठसण्यासाठी मी त्याची काही अंशी पुनरावृत्ति करतो. प्रथम आपण एक लक्ष्यात ठेवले पाहिजे की, श्वासोच्छास झणजे काही प्राण नव्हे. तर श्वासोच्छ्रासाच्या प्रेरणेला कारणीभूत, व श्वासोच्छासाचाही जो जीव तो प्राण. तसेच सर्वप्रकारच्या ज्ञानालाही प्राण हा शब्द लावतात. ह्या सर्वांना प्राण असेंच ह्मणतात. मनालाही प्राणच ह्मणतात. ह्यावरून - आपणांस कळून येईल की, एका विविक्षित शक्तीला प्राण ही संज्ञा