या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. दिलेली आहे. तथापि त्याला शक्ति आहेच असें आपणांस ह्मणतां येत नाही. कारण, शक्ति ही प्राणाचे एक व्यक्त स्वरूप होय. शक्तीच्या रूपाने व चैतन्याच्या रूपाने प्रत्येक वस्तूंत प्रगट होणारा जो तो प्राण होय.चित्त हे एक एंजिन असून तें सभोंवती असलेल्या प्राणांतून प्राण ओढून घेत असते. आणि त्यापासूनच ते ह्या नानाप्रकारच्या जीवनशक्ति तयार करते. देहाचे संरक्षण करणारी जी शक्ति, ती सर्व शक्तींतील प्रधानशक्ति होय. आणि इच्छा, विचार व इतर शक्ति ह्या खालच्या प्रतीच्या होत. प्राणायामाच्या योगाने आपल्याला शरीराच्या आतील दरोबस्त गतीवर आणि शरीरांत वाहणाऱ्या ज्ञानरसप्रवाहावर अंमल चालवितां येतो. पहिल्या प्रथम आपण ते प्रवाह ओळखून घेण्याला प्रारंभ करावा आणि मग हळू हळू त्यांला ताब्यांत आणावेत. नंतर अर्वाचीन योग्यांच्या मताप्रमाणे ह्या प्राणाचे तीन प्र. वाह, शरीरामध्ये खेळत असतात. एक इडा, दुसरी पिंगळा, आणि तिसरी सुषुम्ना. ह्या तीन नाड्यांतून ते तीन प्रवाह असतात, अशी त्यांची कल्पना आहे. पिंगळा ही त्यांच्या मताप्रमाणे पृष्ठरज्जूच्या उजव्या आंगास असते, आणि इडा ही डाव्या आंगास असते. आणि सुषुम्ना पृष्ठरज्जूच्या मध्यावर असून ती पोकळ असते. त्यांचे ह्मणणे इडा आणि पिंगळा ह्या दोन नाड्यांतील प्रवाह प्रत्येक मनुष्यामध्ये वाहत असतात. आणि ह्या प्रवाहाच्या द्वारेंच आपण सर्व आयुष्यांतील कार्य करतो. मुषुम्ना ही सर्वांमध्ये रीतीप्रमाणे असतेच, परंतु तिचा प्रवाह फक्त योग्यांमध्येच चालतो. आणखी एक गोष्ट आपण लक्ष्यांत ठेवली पाहिजे, ती ही की, योग्यांना आपले शरीर बदलतां येते. आणि त्यांच्याप्रमाणे आपण अभ्यास केला, तर आपणांसही आपले शरीर बदलतां येईल. अभ्यासास लागावयाच्या पूर्वी जे शरीर असते, तें अभ्यासानंतर असत नाही. हे अगदीं शक्य आहे, आणि त्याचे कारणही पण दाखवून देता येईल. कारण, विचार ह्मणून जो जो आपणांस करावा लागतो, त्या प्रत्येकासाठी आपणांस जणों काय मेंदूमध्ये एक पाट किंवा चरच खणावा लागतो. आणि त्याच्यावरून मनुष्यखभावाची प्रचंड धांव दिसून येते. मेंदूमध्ये पूर्वीची जी एक चाकोरी पडलेली असते, तिच्यावरूनच मनुष्यस्वभावाला धावणे आवडते. का