या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. रण, तिच्यावरून धावणे सुलभ असते. उदाहरणार्थ, आपण जर कल्पना केली की, मन हे सुईसारखें आहे, आणि मेंदूचा गलगलीत गोळा त्याच्यापुढे आहे. तर प्रत्येक विचार हा त्या मेंदूंतून रस्ता पाडून जात असतो. व रस्ता किंवा विवर बंद होऊ नये ह्मणून करड्या रंगाचा पदार्थ येऊन तो रस्ता मेंदूपासून अगदी अलग राखतो; मुजू देत नाही. त्यामध्ये जर करड्या रंगाचा पदार्थ नसता, तर स्मृति मणून कसली ती राहिली नसती. कारण, स्मरण झणजे ह्याच जुन्या रस्त्यानें, पूर्वीच्या विचाराप्रमाणेच अनुकरण करीत मार्गक्रमण करणे होय. ह्यावरून कदाचित् आपल्या सुद्धां लक्ष्यांत येईल की, प्रत्येकाच्या माहितींतील थोड्याशा कल्पना घेऊन, त्याच एकत्र करून, त्याचे चर्वितचर्वण ज्यांत भरले आहे, अशा एखाद्या विषयावर मी बोलू लागलों, तर ते मला सहज करता येईल. कारण, प्रत्येकाच्या मेंदूमध्ये त्यांचे रस्ते रेखाटलेले असतात. त्या रस्त्यांवरून-किंवा ओरबड्यांवरून जाणे-त्यांचा कित्ता गिरवणे येवढ्याचीच काय ती आवश्यकता असते. परंतु नवा विषय जेव्हा जेव्हां पुढे येतो, तेव्हां तेव्हां त्याला नवे रस्ते-किंवा ओरखडे-तयार करावे लागतात. ह्मणून ते काम तितक्या लौकर होत नाही. ह्याच कारणाने मेंदू (खुद्द मेंदू, लोक नव्हेत.) नव्या कल्पनांना न कळतां आपणावर कार्य करूं देत नाही. तो अडथळा करतो. प्राण हा नवी चाकोरी पाडण्याची खटपट करीत असतो, आणि मेंदू त्याला ती पाहू देत नाही. हीच १. ही गोष्ट हल्ली प्रचारांत आलेल्या " फोनोग्राफ" च्या यंत्रावरून फारच उत्तम रीतीने कळून येईल. फोनोग्राफमध्ये पाहिजे तें गायन, शब्द किंवा भाषण जसेंच्या तसे पाहिजे तितक्या वेळां निघतें, हे बहुतेक सर्वांना माहित आहेच. ह्या यंत्रामध्ये एक लोखंडी रूळ असून त्यावर बसविण्याकरितां फुकणीसारखी मेणाची नळकांडी केलेली असतात. त्याची वरची बाजू कांतून काढून फार तुळतुळीत केलेली असते. व त्यावर 'रिकार्डर' ने पाहिजे तें गायन घेता येतें. रिकार्डरच्या मध्यावर एक हिरकणी बसविलेली असते. ती नळकांड्यास लावून यंत्र सुरू केले ह्यणजे त्यांतील रूळ नळकांड्यासहवर्तमान फिरूं लागतो, व रिकार्डरच्या टोकानें यावर शब्दांच्या उंच नीच स्वराप्रमाणे लांब, आंखूड, उथळ, खोल असा ओरखडा पडत जातो. याप्रमाणे सर्व रूळ त्या ओरखड्यांनी भरला झणजे यंत्र बंद करून