या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. काय ती स्मृतीची गुरुकिल्ली. मेंदूमध्ये ह्या वाटा किंवा ओरखडे कमी असतील, आणि प्राणसूचीही ते कमी करीत असेल, तर तो मेंदू अधिक मंद होईल. आणि ते अधिक असतील, तर नव्या विचारांशी झुंजत बसतील. विचारशील मनुष्यांच्या मेंदूमध्ये हे ओरखड्यांचें जाळे, अधिक गजबरलेले असते. ह्यामुळे नवे नवे विचार तो सहज करतो, व समजूनही घेतो. प्रत्येक नव्या विचाराची गोष्ट अशीच आहे. मेंदूमध्ये आपण नवा ठसा तयार करतो, आणि नवे चर पाडतों. (पुढे चालू ). पुस्तकपरीक्षा. आचार्य-परिषद्-हे पुस्तक रा. रा. दत्तात्रेय कृष्ण दामले ‘आत्मशिक्षण' पुस्तकाचे कर्ते यांनी लिहिले. अनेक पदवीधर व विद्वान् लोक मिळून कोल्हापुर मुक्कामी एक 'ग्रंथमाला' ह्या नांवाचे प्रचंड मासिकपुस्तक काढित असल्याचे प्रसिद्धच आहे. ह्या मालेतील लेखांची भाषा 'रद्दड व पिचपिचित' असल्याचा गवगवाही कोणास माहित नाही असे नाही. त्यांपैकी काही अपूर्व मासला-व पुढे मारून मुटकून प्रचारांत येणाऱ्या विद्वान् व जगन्मान्य' भाषेचा नमुना कोकिळांतही मागेपुढे दृष्टीस पडणारच आहे. तथापि ह्या पुस्तकासंबंधाने एक गोष्ट कळविण्यास मोठा आनंद वाटतो की, हे पुस्तक मात्र त्या नियमास निखालस अपवाद आहे. ह्याची भाषा बहुधा सरळ शुद्ध व डौलदार अशी आहे. हे सुमारे ८०।९० पृष्ठांचे पुस्तक असून त्यांत मोठ्या कळकळीचा सर्व देशबांधवांस उपदेश केलेला आहे. आणि त्यांत एकदेशीयपणा नाही. तर सर्वव्यापक व सर्वोपयोगी अशी तत्वे कथन केली आहेत. रिकार्डर काढून घेतात, व त्याच्या ठिकाणी 'रिप्रोड्यूसर' लावतात. ह्मणजे तेंच गायन यथापूर्व सर्वीस ऐकावयास मिळते. कारण रिप्रोड्यूसरला बोथट टोंकाचा बारिक नीळ बसविलेला असतो. तो त्या ओरखड्यांतून जाऊन यंत्र सुरू झालें ह्मणजे जशाचा तसा शब्दोच्चार होतो. हीच उपपत्ति येथेही लागू पडते. -भाषांतरकर्ता