या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. विचारावें ? बर्कसाहेबांची स्वारी चतुर्भुज होत्साती, हातापायांत सांखळ्यावाळे घालून कोर्टामध्ये समारंभाने दाखल झाली! किती केले तरी मनुष्याचे अंतःकरण ! स्वहस्ताने केलेल्या साऱ्या हत्त्या वर्कच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. कृतकर्मीचा त्यास पश्चात्ताप झाला. त्याला आपल्या मरणाबद्दल कांहींच दुःख वाटले नाही. आपल्या गुप्त गोष्टी सांगण्यास त्याने यत्किंचितही आढेवेढे घेतले नाहीत. त्याने कोर्टापुढें यच्चयावत् गोष्टी कबूल केल्या. आपण व हेअर ह्या पातकांचे भागीदार असून आमच्या उभयतांच्या बायकाच आलास सहाय्य होते, असे स्पष्ट सांगितले. आणि कोर्टामध्ये एक एक खुनाचा पाढा वाचण्यास सुरवात केली. कोर्टामध्ये हा भयंकर मनुष्य व खटला पाहण्यास हजारों मनुष्यांची गर्दी उडाली. पहिल्या दिवशी त्याने बऱ्याच खुनांची हकीगत सांगितली. ती संपल्यावर कोर्टाने आणखी किती खून सागावयाचे राहिले ह्मणून विचारलें. बर्क ह्मणाला 'अझून पुष्कळ सांगावयाचे आहेत.' तेव्हां सर्वांस काय वाटले असेल, हे सांगत बसण्यापेक्षां तें काम वाचकांवरच सोंपवावें हैं बरें. ही खुनांची हकीगत बर्क कित्येक दिवस सांगत होता. व कोर्ट आणि प्रेक्षक ऐकत होते. असा. दी उलट्या काळजाची पाषाणहदयी कृति ऐकून कोटापक्षाहा लोकास अतिशय संताप आला. ते चवताळन अगदी बेफाम झाल. वकच व हअरचे काय करावे आणि काय न करावे असे त्यांस होऊन गेले. बकला पोलिसाने पकडले होते; पण हेअर कांही अद्याप तावडींत सांपडला नव्हता. त्यास शोधून काढावे व त्याचे फाडून तुकडे करावेत ह्यासाठी सारी मंडळी धांवली. त्यांनी हेअर मास शोधून तर काढलाच. पण त्यांची मनीषा मात्र तृप्त झाली नाही. तो तितक्यांतूनही निसटून पळाला, व लंडनशहरांत जाऊन वेष पालटून एका चांभाराच्या घरी जोडे शिवावयास राहिला. बर्कने कृतापराधाबद्दल आपल्या संतप्त देशबांधवांसमक्ष मोठ्या संतोषाने देहांत प्रायश्चित्त घेतले; व हजारों लोकांनी तो त्याचा समारंभ मोठ्या उत्सुकतेने पार पाडला! थोडे दिवस गेल्यावर हेअरच्या ओळखीचीही फूट पडली. परंतु लोकांच्या मनांतील राग तेथपर्यंत बराच कमी झाला होता, व आठवणही मागे पडली होती. तरी हेअर उमगला हे समजतांच लोकांचा त्याच्या भोंवतीं