या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. १३७ आतां सकृद्दर्शनीच पुस्तकाच्या नामनिर्देशावरून असा एक प्रश्न उद्भवतो की आचार्य हे कोण ? श्रीमच्छंकराचार्य की काय ? तेच असतील तर त्यांची परिषद् कधी भरली होती व त्यांनी येवढी जगइवाळू उपदेशामृताची वृष्टि करून सोस गारीगार तरी केले कधी ? आपले माया व ब्रह्म; द्वैत व अद्वैत; ध्यान व धारणा इत्यादि विषय सोडून देऊन ते सामाजिक विषयांत कधींपासून घुसले ? हे गूढ प्रथम सोडविणे इष्ट दिसते. खरोखर ह्या पुस्तकांतील उपदेशच पाहूं गेलें तर, तो फारच सुरेख, मनोरम, चटकदार, आजच्या स्थितीला योग्य असून बहुतेक सर्वमान्य असा आहे. पण त्यासाठी त्यांनी श्रीमज्जगद्गुरूंच्या तोंडी घालण्यासाठी रूपकाचा जो येवढा उपद्व्याप केला आहे तो मात्र अत्यंत विचित्र खरा ! ह्या परिषदेचा घाट त्यांनी येणेप्रमाणे घातला आहे:- ne हिच्यांतील विचार आहेत अर्वाचीन; परंतु परिषद् आहे प्राचीन ऋषिवर्याची व देवतांची. हो; पण चुकले. कारण, आमचे अलीकडचे रामदासस्वामीही त्यांतच मांडीशी मांडी लावून बसले आहेत ! तेव्हां ह्या परिषदेला प्राचीन व अर्वाचीन तत्त्ववेत्त्यांची खिचडी झटले तर अधिक शोभेल. आतां ही परिषद् भरली कोठे झणाल, तर नर्मदानदीच्या पटांगणांत ! दिवस कोणता ? चैत्र शुद्ध प्रतिपदा. वेळ ? करकरीत मध्यरात्र. असें कां? तर पार्लमेंट सभा सुद्धां रात्री भरते ह्मणून. प्रकाश कसला ? रक्तवर्ण. आसने किती ? अठ्याहत्तर हजार कुशासनें. [ एक कमी किंवा जास्ती नाही.] आणि त्यावर विराजमान होणारे कोण कोण ? व किती? वेदव्यास, पतंजली, व याज्ञवल्क्य ह्या तीन मूर्ति. शंकराचार्य आणि रामदासस्वामी | मंडळी समकालीनच खरी! पण ह्यांत रामदासस्वामींचे काय प्रयोजन ?1 नंतर चंडी व विनायक-मंगलमूर्ति-व्यासपीठारूढ झाले. नंतर आदिमायेने उठून भाषणास आरंभ केला. त्यांत "प्रिय पुत्रांनो !” तुझी मोठे ज्ञानसंपन्न आहां इत्यादि स्तुति केली. " तुमच्या गुणांला व लौकिकाला पाहून देवांना परम समाधान वाटले. तुझी परक्याचा छल केला नाही... परकीयांच्या रक्ताने तुमचे हात विटाळले नाहीत. मत्त गजाप्रमाणे पृथ्वीच्या पाठीवर धिंगाणा घालून रक्ताच्या नद्या उत्पन्न केल्या नाहीत. अंगांतील पशूचा बळी देऊन, महायज्ञ ज्यांनी केला, आणि तेणेकरून देवांना प्रसन्न करून मनुष्यजातीचे महत्त्व ज्यांनी वाढविले, असे जगतांत तुझीच एकटे निर्माण झालां.” इत्यादि स्तुति करून सांप्रतची त्यांची योग्यता किती आहे, याबद्दल त्यांची पूजा करण्यास आरंभ केला. व "पूर्वीच्या प्रतापशाली आर्याचे १८