या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. तुझी पुत्र आहां असें दिसत नाही. इतकेच नव्हे, तर तुझी माणसें आहां याबद्दल देखील संशय पडूं लागला !" ह्या सूत्रावर 'यस्य स्मृत्या' झाला. नंतर आईसाहेबांनी 'आचार्यो'कडे आपला मोर्चा फिरविला. आणि त्यांवरही बराच ताव झाडला. त्यांतील मुख्य मुद्दा " आचार्य हो! भारतीयांच्या ह्या स्थितीबद्दल तुझी सर्वस्वी जबाबदार आहां. सांप्रतच्या स्थितीवरून पाहतां हे काम तुहीं बजाविले नाही असे स्पष्ट सांगावे लागते.” हे एक वेळच नव्हे, तर त्रिवार बजावले. येवढेच नव्हे, तर पुढे लिहिल्याप्रमाणे चांगला दपटशाही दिला, "तुमच्या, तशीच त्यांच्याही उद्धाराची जोखीम तुह्मांवर आहे. ती तुझी जाणली नाही आणि आपले कर्तव्य बजाविले नाही तर, तुह्मांस इतकें पाप लागेल की, त्याच्या तीव्र ज्वालेने तुमचें अध्यात्म-सिद्धि-रूप सर्व पुण्य जळून राख होईल." नंतर पुन्हा आचार्यास 'ताकीद' झाली की, “ अद्याप पुष्कळ गोष्टींची सीमा सांपडावयाची आहे; तत्त्वांचे व्याकरण व्हावयाचे आहे; [तें कसे काय ? ] शक्तींचा उत्कर्ष दिसावयाचा आहे. इतक्यांत आचार्यांनी हातचे धनुष्य खाली ठेवू नये. [जगद्गुरूकडे हे गोलंदाजाचे काम कधींपासून आले ? नंतर आईसाहेब ' सर्वांना त्या ठिकाणी बोलावण्याचे कारण ' सांगतात. [बोलावतात कोण, आणि कारण सांगतात कोण ?] 'तात्पर्य निबंध जे पाहिजेत ते कालस्थितीला व लोक-योग्यतेला अनुरूप असून स्थिति सुधारणारे व योग्यता वाढविणारे असे असावेत एवढ्यानेच तुमचे कार्य संपलें नाही. तुमा सर्वांना आमची अशी ताकीद आहे की, तुह्मी आपल्या कार्यां निरंतर दक्ष राहून भाषणाने व आचरणाने असमंजस जनांचे खरे हित कशांत आहे याविषयी त्याचा समजूत घालीत जावें.” कारण, "भारतवर्षांतील प्रजाजन भोळा, सालस, प्रामाणिक, हूड, आणि गाफील आहे. त्याजकडे आधी आणि अधिक लक्ष पुरवा.” नंतर आपल्या भाषणाचा उपसंहार करतांना आदिमाता ह्मणतात:"आतां थोडक्यांत उपोद्घातरूपानें व्यासमुनि पूर्व वृत्तांत सांगतील व आज जें काम करावयाचे आहे त्याची दिशा सुचवितील, तिकडे सर्वांचे अवधान असावे." ह्याप्रमाणे जगन्मातेचें आवेशाचे, कळकळीचे, व कडाक्याचे भाषण झाल्यानंतर "आज्ञेप्रमाणे वेदव्यास उठून उभे राहिले आणि भाषणास आरंभ केला." व त्यांत आपण "भरतभूमीचे पुत्रत्व अंगीकारून " आपणांस किती वर्षे झाली? आपली उन्नति कसकशी होत गेली, व अखेर सर्वस्वाचा -हास कसा झाला,