या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. ह्याचे हे एकुणिसावें पुराण कथन केले. आणि ह्मणाले " आचार्यांनी समाधि विसर्जन केला व सर्व जण दांती तृण धरून परवशतेच्या बिडीत अडकलेला अवलोकन केला!" व " या आर्यप्रजेच्या अपकर्षाबद्दल आपण सर्वस्वी जबाबदार आहो." ह्मणून प्रांजळपणे आपली चूक आपल्या पदरांत घेतली ! ह्या अर्वाचीन पुनरुज्जीवित व्यासोनारायणांच्या वाणीतील काही मथितार्थ आमच्या वाचकांस श्रुत करतो. तो असाः " केवल नीतीची तत्त्वे अप्रतिम, हितकर, व पुरुषार्थदायक खरी; परंतु विशेष अधिकार व विशेष परिस्थिति यांचें आनुकूल्य असल्यावांचून त्या नीतितत्वांचा अंगीकार झाल्यास त्यापासून अर्थापेक्षा अनर्थ अधिक होतो." आतां आजच्या नीतीची व्याख्याः राष्ट्रांच्या झगड्यांत सुख, सत्ता व स्वतंत्रता बळकावून बसण्याला व अब्रूने स्वत:चे रक्षण करण्याला, जे काही पाहिजे असेल, तें आज ज्या उपायांनी मिळेल ती आजची नीति." आतां कालमन्वंतराप्रमाणे काही नियम सांगतातः “ उपदेश, नीति आणि वर्तन कालानुसार आणि योग्यतेनुसार असणे जरूर आहे. व तसे असेल तरच तें हितकर होईल." आतां आचार्यास काही गुरुमंत्र: “आचार्य हो! आपल्या रक्ताने स्नान घालून लोकांस शुचिर्भूत करा. [आचार्याचे रक्त ते कसे काय काढावयाचें ? ग्रंथकाराची अलंकार व रूपक करण्याची हातोटी अपूर्वच खरी ! 7 शिव होऊन शिवाचे वजन करावे लागते. तद्वत् कलीचा कावा ओळखून अथवा प्रसंगविशेषीं कलिरूप होऊन प्रजेकरितां प्रजेचे कलीपासून संरक्षण केले पाहिजे." " आज हिंदुस्थानांत तुमच्या वतीने जे तुमचे प्रतिनिधि ह्मणून समाजांत वापरत आहेत त्यांची स्थिति इतकी भ्रष्ट झाली आहे की, त्यांच्या स्वार्थपरतेमुळे, दुराग्रहामुळे, आणि अज्ञानामुळे साऱ्या हिंदुसमाजाचा, आपण चांगला प्रतिकार न केल्यास, लौकरच नाश होईल अशी भीति वाटते." हे हल्लींच्या समाजधुरीणांस दुसऱ्या व्यासांनी दिलेले सर्टिफिकेट फारच ध्यानात ठेवण्यासारखे आहे ह्यांत संशय नाही. हे शरसंधान कोणावर आहे हे काही समजत नाही. अस्तु. ह्याप्रमाणे ह्या नव्याने अवतीर्ण झालेल्या व्यासांनी ह्याप्रमाणे सद्यःस्थितीवर भले मोठे पुराण वाचून नवे निबंध करण्यास सुरवात