या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. केली. नंतर सर्वानुमतें हल्लींच्या काही अंशी 'सामाजिक परिषदे'च्या धर्तीवर विस्तृत असे ३२ ठराव केलेले आहेत. त्यांजविषयी पुढे लिहूं. तूर्त वरील काल्पनिक परिषदेविषयी थोडासा विचार करूं. रा. दामले ह्यांनी हा रूपकाचा येवढा खटाटोप का केला, व त्यांतील उद्देश काय, हेच आझांस कळत नाही. ७८००० कुशासनें काय, आणि त्यांवर हातांच्या बोटांइतकी मंडळी बसतात काय ? विघ्नराज येऊन सिंहासनावर बसतात; व आदिमाया येऊन तर लेक्चरच्या लेक्चरच झोडूं लागते ! याज्ञवल्क्य, पतंजली, शंकराचार्य हे सभासद ! आणि त्यांतच एक रामदासस्वामी ! असा ह्या परिषदेचा विचित्र व लोकोत्तर काल तरी कोणता ? आणि रामदास परिषदेला जर हजर होते, तर तुकाराम, वामन, रंगनाथस्वामी ह्यांनी काय कोणाचे मांजर मारले होते, का त्यांचे पाय दुखत होते? आचार्यांची मुख्य परिषद्, आणि ते तर शुंभनिशुंभांसारखे मुखस्तंभ बसतात! तोंडावरची माशी उठेल तर शपथ ! आदिमायेने उठावें, तोंड सोडावें, व्यासांनी उठावें, त्यांच्यावर चार्ज ठेवावा, आणि आचार्यांनी त्याच्यावर ब्र सुद्धां न काढतां मूग खाऊन बसावें, ह्यांतील मतलब काय ? त्यांचे ज्ञान, त्यांची बुद्धि, त्यांचे वाक्पाटव ह्या परिषदेच्या गारव्याने भिजून जाऊन त्यांच्या धोंडी तर बनल्या नाहीतना ? एकाने उठून आयेपुत्रास ह्मणावें, तुमच्यासारखे ज्ञानी, तुमच्यासारखे सहिष्णु साऱ्या त्रिभुवनांत धुंडलें तरी मिळावयाचे नाहीत. आणि दुसऱ्याने उठून ह्मणावें "तुमची गणना माणसांत करणे सुद्धा कठीण !" एकाने ठरवावें, व्हास झाला ह्याचे कारण आमचा दोष; आचार्यांकडे काही नाही. आणि दुसऱ्याने सर्वतोपरी आचाोस दोषी ठरवून त्याचा धडधडीत जाब विचारावा, ह्यांत स्वारस्य तें काय ? ह्यावरून ह्या काल्पनिक उभारलेल्या आचार्यपरिषदेच्या मंडपांतील व्यवस्था कशी काय रचली गेली आहे, हे वाचकांच्याही बहुधा ध्यानात येईलच. ह्मणजे नुकतीच बड्या पार्लमेंटमध्ये झालेली बंडाळी, आणि ही आमच्या ऋषिवर्यातील बाचाबाची बहुतेक एकाच तोडीची आहेत, झटलें तरी, काही फारसा बाध येणार नाही. तात्पर्य काय की, रा. दामले ह्यांनी नुसताच जर उपदेश केला असता, तरी त्यास काही कमी महत्व आले असते, असें निदान आझांस तर वाटत नाही. आदिमायेला सभेपुढे उभी करणे, व्यासांच्या तोंडांत ह्या नव्याच त-हेच्या उक्ति घालणे, आचार्यांना मुखस्तंभ करून ठेवणे, रामदासाला वेठीला धरणे, असा खेळखंडोबा करून आचार्यांची ही परिषद् आणि आपला हा लेख ही दोन्हीही