या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. ग्रंथकारांनी हास्यास्पद मात्र करून सोडली! असो. आतां हे महाद्वारवैभव सोडून देऊन आंतील मुख्य उपदेश कसा आहे त्याकडे वळू.. माहा उपदेश झणजे अर्थात् सर्वानुमतें केलेले पूर्वीचे ३२ ठराव होत. ह्यांत राष्ट्र, प्रपंच, ऐहिकसुख, आहार, व्यायाम, शरीरसंरक्षण, शिपाईगिरी, उद्योम, स्त्रिया, राजयोग, इत्यादि अनेक विषय आलेले आहेत. ह्यावरील विचार कित्येक ठिकाणी अतिशयित उत्कृष्ट आहेत. पण क्वचित् एकदेशीयही आहेत. एकंदरीत भाषा फार सरळ, साधी व चटकदार अशी साधली आहे. स्त्रियांना कसे वागवावें, केव्हां लग्न करावें इत्यादि नियम जरी ठरविलेले आहेत तरी त्यांत सुधारक किंवा असुधारक ह्यांपैकी कोणताच पक्ष स्वीकारलेला नाही. सारा उपदेश बहुधा तिन्हाईतमताने केलेला आहे. आतां येवढ्या द्राविडी प्राणायामांत वादग्रस्त स्थळे बरीच उद्भवतील हेही काही सांगितले पाहिजे असे नाही. तथापि एकंदरीत पाहिले तर रा. दामले ह्यांचे वक्तृत्व, व लेखनपाटव फारच तारिफ करण्यासारखें ह्यांत शंका नाही. सर्व सामाजिक विषयावर असा अस्खलित व विपुल उपदेश करता येणे हे काही सामान्य बुद्धीचे काम नव्हे. शिवाय त्यांत विशेष हे आहे की, कित्येक तत्त्वे जरी पूर्वीचीच ठराविक आहेत, तरी ती सांगण्याच्या हातोटींत नवीनपणा व माधुर्य आहे. आणि प्रत्येक लेखांत जे काय असावे लागतें तें हेंच, आणि त्यावरूनच ग्रंथकाराची योग्यता वाढते. एकच विचार खुलवून देण्याला एकप्रकारचे विशेष चातुर्य लागत, आणि त्यालाच प्रसाद ह्मणतात. आणि तो प्रस्तुत ग्रंथकारामध्ये पुष्कळच अशानं दृष्टीस पडतो. ह्याकरितां त्याबद्दल विशेष न लिहितां कांही ठळक ठळक वाक्येच दाखल करतो. झणजे वाचकांस त्यांचे विचार, भाषाशैली, वगैरेची सहज कल्पना होईल. ही वाक्ये झणजे एक प्रकारची सुभाषितेंच होत: "राजसिंहासनावर कोणीही आरूढ होवो, त्यांच्या जातीकडे अथवा वयाकडे न पाहतां त्यांचा आदर करावा. परंतु राजा विष्णु नव्हे, राज्य राजाचें; नव्हे लोकांचे आहे." " खरे सुख हव्यासांत आहे; खरें सुख प्राप्तींत आहेखरें सुख कर्तव्यांत आहे. ज्ञानाविषयीं, लौकिकाविषयीं, सुखाविषयीं, संपत्तीविषयीं, खातंव्याविषयीं, परोपकाराविषयीं, पराकाष्ठेचा हव्यास असूंद्या." "वैराग्य, वासनाक्षय, कर्मफलत्यागाचा योग, परलोक, निर्वाण इत्यादि गोष्टी ज्यांच्या आटोक्याबाहेर असतील त्यांस त्या तूर्त खोट्याच आहेत व ह्मणून त्यांच्या योग्यतेस आणि परिस्थितीस अनुरूप नसल्यामुळे त्या त्यांचे हित करणार