या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. नाहीत. तुह्मी त्या सांप्रत विसरा व आपल्या कोशांतही त्यांस हरताळ लावा." "शरीर दृढ व दीर्घ (!) करण्याकरितां व राखण्याकरितां आणि आयुर्मर्यादा वाढविण्याकरितां खाद्यपेयांत जे फेरबदल करणे इष्ट दिसेल ते खुशाल करावेत आणि वैद्यशास्त्राच्या दृष्टीने में हितकर ठरेल तें बेलाशक घ्यावें." " निर्वाहाची साधनें हवीं त्याने हवीं ती उचलावी; आवडीचे विषय रुचतील ते निवडावे; परंतु सारें राष्ट्र नखशिखांत क्षत्रिय झाले पाहिजे. यांतच तुमचें व तुमच्या राज्यकर्त्यांचे खरें हित आहे." " भगवद्गीतेत वाखाणलेली दैवीसंपत्ति, सत्त्वगुण, मोक्षमार्ग, ब्रह्मचर्चा, यांविषयी बुद्धिवाद सांगावयाला आझी तुझांजवळ आहो. तें काम करावयाला अमेरिकेतील, रशियांतील अथवा विलायतेंतील बायामाणसांच्या भूतदयेची तुझांस गरज नाही. तेच मुळी आमचे शिष्य आहेत; ते आह्मांपेक्षां तुहांस अधिक तें काय सांगतील ? त्यांचा वरील विषयासंबंधानें तुझांस हल्ली जो बोध चालला आहे, तो तूर्त तुझीं बिलकूल ऐकू नये असे त्यांच्या गुरूचे तुझांस सांगणे आहे." या किंबहुना जगांतील सारी रानटी हिंस्र श्वापदें ही माणसाळून मेंढरांसारखी गरीब होईपर्यंत तुझी कांही असुरी वृत्ति शिल्लक असूच द्या. तोपर्यंत तुमच्या आंगी कामापुरतें पशुत्व कायम राहंद्या! कोल्ह्याचे कपट, माकडाची दगाबाजी, कावळ्याची धूर्तता, सर्पाची सावधगिरी, डुकराचा बेफामपणा, वाघाचें क्रौर्य, व सिंहाचें धैर्य ही एकत्र मिळवा व माणसाच्या अकलेच्या तंत्राने त्यांचा समय पाहून उपयोग करा. हणजे सर्वकाली सर्व अरिष्टांपासून तुह्मी निर्भय रहाल.” " देव प्रसन्न व्हावा असे जर तुझांस वाटत असेल, तर तुझी स्वतःला प्रसन्न करून घ्या." " समजत नाही त्यावर भोळेपणाने विश्वास ठेवू नका." " ऐहिक संपत्तीचा संग्रह करा. सोने, नाणे, रत्ने, यांचे भांडार भरा. अनेक प्रकारच्या उद्योगांनी आणि साहसांनी सुखाची आणि ऐश्वर्याची सर्व साधनें उपभोगासाठी हस्तगत करा. त्रैलोक्यांत उपयुक्त आणि मोल्यवान् जेवढे सांपडेल तेवढे आणून घर भरा." आपल्या स्त्रियांना बरोबरीचा मान द्या. त्यांस मित्र समजा. व्यवहारांत त्यांस मोकळेपणाने वापरू द्या. त्या तुमच्या दासी नव्हत. केवळ तुमच्या सुखाची साधनें नव्हत. उभयतांची योग्यता सारखी आहे. ह्मणून स्त्रियांस तुमच्या बरोबरीने सज्ञान होऊंद्या. लग्ने स्वयंवरपद्धतीने प्रौढ वयांत होऊ द्यावी."