या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १९०१. " विलायतेंतील तीन र'कारांचे शिक्षण झणजे तीन सुरांनी रडणे होय. नुसतें लिहिणे, वाचणे घेऊन, स्वतंत्र विचाराला आणि व्यवसायाला फारकत देऊन, केवळ ताबेदारीला योग्य ठरणारे गुलामाचे शिक्षण फुकट मिळाले तरी घेऊ नका." " मोठा उल्हास, मोठा आवेश, मोठा वेग, मोठी ईर्षा यांनी अंतःकरण तुडुंब भरले पाहिजे. ह्मणजे पहा काय काय चमत्कार होऊ लागतात ते ? तुझी अगदी निर्जीव, निरुत्साह, निःसत्व, निस्तेज, निर्माल्य बनून गेलां आहां. जगण्याची हौस नाही, स्वातंत्र्याची चाड नाहीं, संसाराची आस्था नाही, शास्त्राची अभिरुचि नाही, पराक्रमाची ईर्षा नाहीं, साहसाची गोडी नाही, कलेची आवड नाही, स्वतःविषयी आणि स्वदेशाविषयी अभिमान नाही." “ अन्यकाली अहिंसा नीति असेल, परंतु युद्धकाली हिंसा हीच नीति होय." DA " अविचारी भोळ्या माणसांनी मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष करून नियमाचे महत्त्व वाढविले आणि शेवटीं फसले." "रूढीला भिऊ नका, आणि बहमताला मनाविरुद्ध मानूं नका. तुमच्या विचारास जे योग्य दिसेल तें खुशाल बोला आणि चाला; मग त्यापायीं जे ' होईल तें होवो.” "प्रत्येकाने शक्तीप्रमाणे पराक्रम केलाच पाहिजे. हणजे तुह्मांत आळस राहणार नाही व मिंधेपणा शिरणार नाही." "उपकार तसाच अपकार सव्याज परत करा.” । हैं वाक्य आचार्यांच्या तोंडी किंवा लेखांत घालणे, हणजे त्यांच्या सात्विकवृत्तीची एक मोठी साक्षच झटली पाहिजे ! "आयद्याला धर्म करून भरतभूमीचा भार वाढवू नका, भिकाऱ्याला भीक वाढून भिकेची तयारी करू नका. व्यसनग्रस्ताला पोसून दुर्व्यसनास उत्तेजन देऊ नका. टोणग्यास पाळून सरस्वतीचा उपमर्द करूं नका. आणि एकंदरीत उत्पन्न करण्यासारखे असून जे काहीच उत्पन्न करीत नाहीत अथवा राखीत नाहीत त्यांना फुकाचे जगवू नका.? " सत्पात्रीं द्यावेसे वाटून देणे हेच दान; मागेल त्याला कंटाळून देणे दान नव्हे." १ तीन रकारांचे शिक्षण, ह्यावर टीप द्यावयास पाहिजे होती. रीडिंग (वाचन) यटिंग (लेखन), आणि अरिथमेटिक (गणित) ह्या तिहींत रकार असल्यामुळे ह्यास 'तीन रकारांचे शिक्षण' असें पाश्चात्य देशांत नांव आहे.