या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. संकटाला तुझी संकटाप्रमाणे वाटावे आणि अडचणीला उलट तुमची अडचण व्हावी.” " तुझी दैत्या पुढे दबू नका, सत्तेपुढे लवू नका, विद्वानापुढे विरघळू नका, आणि श्रीमानापुढे घाबरूं नका. गरीबीच्या गाढवावर बसला असलां तथापि सरदाराच्या रथाला खेटून ऐटीत आपल्या वाटेने पुढे निघून जा." " ग्रीस आणि रोम ह्यांचा गळा शेवटी सुखानेच कापला, आणि तुमचीही चिता त्यानेच पेटविली. मिळवेल तितकें सुख मिळवा आणि सेवन करा; कारण त्यासाठीच साऱ्या खटाटोपाची प्रवृत्ति आहे. परंतु त्याचे अजीर्ण होऊ देऊ नका." रूढींनी जखडली असता, दुराग्रहांनी सुकविली असतां, पोकळ श्रद्धेनें पोखरली असतां, पराधीनतेने ठेचली असतां माणसांची मनेंही निर्जीव, निरुपयोगी आणि जड होतात." " भोळेपणाने भलतेच भेद उत्पन्न करून भांबावून जाऊ नका." " एकपत्नीव्रत आणि उपभोगाविषयी नियमितपणा राखिल्याने ब्रह्मचर्यत्रताचे श्रेय प्राप्त होते आणि मनुष्यस्वभावाच्या व राष्ट्रीय परस्थितीच्या दृष्टीने पहातां माणसाने विवाह करावा हेच त्यास उचित व सुखावह आहे." " लोक अडदांड आहेत ह्मणून अनादर होऊ लागला, ही गोष्ट खोटी असून पूज्यभाव उत्पन्न व्हावा अशी योग्यता आणि करामत आचार्यात उरली नाही आणि लोभाविष्ट व स्थानभ्रष्ट होऊन इतर वर्णांशी त्याच्या व्यवसायांत ते स्पर्धा करूं लागले, हेच त्याचे खरे कारण होय.” येवढ्या वेंचांवरून प्रस्तुत परिषदेंतील सुभाषित व उपदेश किती भारदस्त व मोल्यवान् आहे हे सहज समजून येईल. तथापि त्याचा कल थोडासा एका बाजूस कसा ढळता आहे, हेही मार्मिक वाचकांस निराळे सांगणे नको. एकंदरीत सदरहू पुस्तकांतील विचार पोक्तपणाचे व समतोल आहेत. व भाषा, आवेश, कळकळ, विचारशैली ह्याही उत्तमोत्तम आहेत. तेव्हां अर्थात् हे पुस्तकही अत्यंत संग्राह्य आहे. ह्यास्तव रा. दामले ह्यांनी महाराष्ट्रभाषेमध्ये एका उत्तम पुस्तकाची भर घातली ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून तूर्त निरोप घेतो. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.