या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. प्यासारखें बोलण्याचाच गुण आहे असे नाही, तर त्यास उत्तम शिकविणारा असल्यास तो, मनुष्यासारख्या आणखीही कितीएक अद्भुत कृति करून दाखवितो. ह्याचे आजमितीस उदाहरण झटले झणजे बडोद्यास श्रीमंत गायकवाड यांच्या पदरी बाळगलेले दोन तीन प्रसिद्ध पोपट होत. गायकवाड ह्यांच्या राजधानीत कोणी मोठे राजेरजवाडे किंवा गव्हरनर साहेबांसारखे अधिकारी आले ह्मणजे पाहुण्यांच्या सत्कारार्थ ह्मणून हत्तींच्या व गेंड्यांच्या टकरा, साठमान्य, वज्रमुष्टी वगैरे खेळ दाखविण्याचा प्रघात आहे. हा खेळ झाला ह्मणजे शेवटी पोपटांच्या कृति दाखवितात. त्या ज्यांच्या अवलोकनांत आल्या नाहीत त्यांना त्या अद्भुत वाटतील ह्यांत संशय नाही. पाहुण्यास व महाराजांस मुजरा करणे, खोटें नाणे व खरें नाणे निवडून देणे, प्रत्येकास पानपट्या नेऊन पोचविणे, मलखांब करणे, तीर मारणे, इत्यादि कृति तर असोच; पण त्यांतील एक पोपट तोफ उडवून दाखवितो, ती मजा तर फारच प्रेक्षणीय असते. ही तोफ लहानशी पितळेची सुमारे वीतभर लांबीची असून ती लहानशा गाडीवर घातलेली असते. व तिचा आवाज बंदुकीहूनही थोडासा मोठाच होतो झटले तरी चालेल. ही तोफ आणून त्या पोपटाजवळ ठेवतात. दारूने भरलेल्या कांहीं लहान लहान पिशव्या, एक तोडा, एक आगपेटी. गज इत्यादि सामानही तेथेच आणून ठेवतात. नंतर त्या पोपटाचा शिक्षक त्यास तोफ भरण्याविषयी आज्ञा करतो. नंतर तो पोपट ती दारूची पिशवी तोफेच्या तोंडाजवळ आणतो, तिचे तोंड चोंचीनें खोलून तिच्यांतील दारू फार बेतानें तोफेत ओततो, गज घेऊन ती ठांसतो. कान्ह्यावर दारू भरून ठेवतो, नतर आगपेटी घेऊन काडी ओढतो, व तोडा पेटवितो. तो चांगला तयार झाला ह्मणज लहानसा खांब असतो त्यावर चढून एका पायांत तोडा धरतो. व तोंडाने महाराजांस व पाहुण्यास "आज्ञा' 'आज्ञा' ह्मणून त्रिवार परवानगी मागतो. ती मिळाली झणजे तो धीट पक्षी एकदम तोडा शिलगून तोफ डागतो. व तो भयंकर आवाज झाला, तोफ बरीच मार्ग सरली तरी, रेसभर जाग्यावरून हालत नाही, किंवा पंखही फडफडावित नाही. तर उलट आपल्या मूळ शब्दाने ओरडून आश्चर्य झाल्याचे दर्शवितो. जणों काय "कशी मौज झाली?असेंच ह्मणत