या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २७९ पाळा पडला. त्यांनी त्यास यथेच्छ बुकलला व अखेर त्याच्या डोळ्यांत झणझणीत चुना घालून त्यास आंधळे करून टाकले. मोठ्या पराकाष्ठेनें जीव मात्र वांचला. मग तो मोठ्या कष्टानें कानडादेशांत जाऊन तेथेच हालअपेष्टेत मेला असें ह्मणतात. ह्या पाश्चात्य राक्षसांपुढे आमचे बिचारे ठग कांहींच नव्हेत! बर्कच्या कैफियतीपुढे आमच्या 'ठगाच्या जबानी'ची मातब्बरी ती कसली ? वरच्या दुष्कर्माचें आश्चर्य वाटण्यापेक्षां आमच्या वाचकांना ह्या अशा अर्वाचीन कालांत, अशा मोठ्या शहरामध्ये, भरवस्तीत धडधडीत खुनांचे काम व व्यापार चालून त्याचा इतक्या कालपर्यंत सरकारास सुगावा लागू नये, ह्याचें मात्र आश्चर्य वाटेल खरें. ह्याचा जेव्हां गवगवा झाला, तेव्हां झालेल्या हयगयीच्या, व आंधाराच्या निरसनार्थच जणों काय, त्याच्या पुढील वर्षीच पार्लमेंटमध्ये ह्या संबंधाचें एक बिल निघालें. असो. तात्पर्य काय, की 'दिव्याखाली आंधार' हा काही केले तरी चुकावयाचा नाही. माला TAT पुस्तकपरीक्षा. हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास. भाग पहिला. भाग पहिला. (मुसलमानी रियासत.) - हा सुंदर व अत्युपयोगी, सुमारे ८०० पानांचा ग्रंथ अत्यंत परिश्रमाने रावसाहेब गोविंद सखाराम सरदेसाई, शिक्षक, राजपुत्रविद्यालय, बडोदें, ह्यांनी तयार करून मेसर्स दामोदर सांवळाराम आणि मंडळी ह्यांनी छापून प्रसिद्ध केला, व त्याची एक प्रत आह्मांस पाठविली, ह्याबद्दल कृतज्ञतापूर्वक आभार मानून आज त्यांतील गुणदोषविवेचनास प्रारंभ करतो. रावसाहेब सरदेसाई ह्यांची, आह्मांपुढे आलेली ही दुसरी कृति होय. पूर्वी ह्यांनीच केलेल्या 'इंग्लंददेशाचा विस्तार" नामक ग्रंथावरील कोकिळांत आलेला अभिप्राय आमच्या वाचकांच्या स्मरणांत असेलच. त्या ग्रंथापेक्षां ह्या ग्रंथाचे परिश्रम व महत्त्वही विशेष-पुष्कळपटीने अधिक-आहे. कारण, तो -