या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. आहे! शिकविल्याने मनुष्याच्या कृति करणारे पशू व पक्षी अनेक आहेत. परंतु मनुष्यासारखे बोलण्याचा जो अद्भुत गुण तो त्या परमेश्वराने फक्त एका पोपटास मात्र दिला आहे. ही गोष्ट विशेष ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. मनुष्यांच्या कृति करण्याच्या तन्हा पशृंमध्ये तर फारच दृष्टीस पडतात. पूर्वीचे आपल्यांतील पशुशिक्षण देणारे झटले झणजे एक एक जातीस एक एक असत. उदाहरण, घोड्यांस शिक्षण देणारे चाबुकखार. उंटांस शिक्षण देणारे सारवान. माकड व बकरें यांस शिक्षण देणारे डोंबारी. अस्वल, वाघ इत्यादि हिंस्र पशूस पाळणारे व शिक्षण दणारे दरवेशी. ही मंडळी आलीकडे तर बहुधा, लुप्तच झाली मटले तरी चालेल. तथापि माकड, बकऱ्यांचे खेळ व कृति; 'सासूसासांची घागर उचलणे' 'देवजी धसाड्याचे आपल्या प्रियपात्रावर संतापणे' इत्यादि खेळ मधून मधून दृष्टीस पडतात. अखलाचा नाच व त्याचे गुरगुडी ओढणे हीही अद्याप कोठे कोठे तुरळक पहावयास मिळतात. परंतु जयांची अदलाबद्दल ही सारखी चालू रहावयाचीच. त्या नियमान्वय दरवंशाच्या ऐवजी आतां 'वुइलसन साहेबांची सरकस' 'छत्र्यांची सरकस' 'तासगांवकरांची कसरत' अशा रूपाने प्रस्तुत मन्वंतरामध्ये ते पशुपक्ष्यांचे शिक्षण मोठ्या थाटमाटाने समाजापुढे येऊ लागले आहे. माकडांना मनुष्यासारखा पोषाख देतात. पण प्रथम तें घालित नाही. कारण, त्याला वाटते की, आपणांलाही मनुष्यच समजतील. व ते तर त्याला पसंत नसते, कारण स्वाभिमान! पण त्यांस शिकविणारे लोक त्यांनी खाण्याच्या पूर्वी ती गोष्ट केलीच पाहिजे ह्मणून सक्ति करितात. व काठी घेऊन त्यांजला पोषाख घालावयाला लावतात. ह्याप्रमाणे माकडानी पोषाख घालून राजाराणी, चोपदार भालदार, पोलिसचे शिपाई बनण; खाण्याचे पदार्थ आणून मनुष्याप्रमाणे पाने वाढणे; व मध्यंतरी कोणत्याही पदार्थास हात न लावतां नेमलेल्या वेळींच शिस्तवारीने भोजन करणे; मनुष्याप्रमाणे दोन पायांवर सर्व व्यवहार करणे; गाडी जुंपणे; कोचमन बनणे; गाडी हाकणे रस्त्यामध्येच चाक मोडणे; ते दुरुस्त करणें ; व पुन्हा स्वारी चालू होणे; दोरीवरून चालणे इत्यादि क्रिया केवळ माकडांनी केलेल्या पाहून कोणास आश्चर्य वाटणार नाहीं? परंतु