या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. अमेरिकेंत छापखान्यांतील टाइप जुळण्याचे काम सुद्धां जर माकडे करतात, तर ही कामें त्यांनी केली ह्मणून फारसें नवलही वाटावयास नको. तरी माकड हा देहाकृतीने मनुष्याशी पुष्कळ अंशी जवळ जवळ असल्यामुळे, त्याच्या बुद्धीचे कोणास फारसे कौतुक वाटणार नाही. पण घोड्यासारख्या शुद्ध चतुष्पादानें, हत्तीसारख्या अवजड प्राण्याने व सीलासारख्या हेंगाड्या व मठ्ठ प्राण्याने अशा लोकोत्तर कृति करणे ह्मणजे मात्र अद्भुत गोष्ट खरी, ह्यांत शंका नाही. मोकळ्या सोडलेल्या घोड्यांनी, केवळ दूर अंतरावरून खुणावणाऱ्याच्या हुकुमांत धावणे, थांबणे, उलट खाणे ही गोष्ट सुद्धा काही कमी आश्चर्याची नाही. तांबडा, पिवळा, हिरवा इत्यादि रंगारंगांचे हातरुमाल हुडकून आणणे, मेल्याप्रमाणे हातपाय व कान न हालवितां व श्वासोच्छासही न सोडतांचाबकाचा मार, पिस्तुलाचे बार, मुकाट्याने सहन करणे, व मनुष्यांनी ताटीवरून उचलून नेले तरी हूं कां चूं न करणे ह्मणजे आज्ञातत्परतेची खरोखर शिकस्त झाली ह्मणावयाची. जळत्या आगीतून पार जाणे, गोळ्यावर पाय ठेवून गोळा जिन्यावर चढविणे, लहान मुलांस घसर, न देतां पाठीवर घेऊन भरधांव पळणे; व मी मी ह्मणविणाऱ्या चाबुकखाराला सुद्धा आपल्यावर बसूं न देणे, किंवा बसलाच तर लगेच त्याला जमीनदोस्त करणे, ह्या गोष्टी काय सामान्य ? हे केवळ अश्राफ प्राण्याविषयी झाले. पण सिंहासारख्या व वाघासारख्या भयंकर, हिंस्र पशूला सुद्धा जो गोगलगाय करून सोडतो, त्या मनुष्याच्या चातुर्याचे वर्णन किती ह्मणून करावें ? सिंहाच्या पिंजऱ्यांत निःशस्त्रपणे बेधडक शिरून त्यास चाबकाखाली झोडणे, त्यावर पिस्तुले झाडणे, त्याच्या आंगावर लोळणे, त्यास लातांखाली तुडविणे, व त्याचा विशाळ जबडा दोन्ही हातांनी वासून त्यांत आपली मान देणे, ह्या कृति पाहून कोणाच्या आंगावर रोमांच उभे रहाणार नाहीत? वाघ तर सिंहाहूनही फार भयंकर व विश्वासघातकी जनावर होय. पण त्याला सुद्धां मनुष्य आपल्या कबजांत आणिल्यावांचून सोडित नाही. तथापि वाघास शिकविणे ते त्यास लहानपणी धरून आणून बाळगून मग शिकवितात. नाहीतर त्याचा विश्वास नाही. तो लहानपणापासून मनुष्याच्या शिक्षेखाली असला, तर पुष्कळ चमत्कारिक कृति