या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. १४९ करतो. दोन दोन वाघ गोळ्यावर पाय ठेवून घोड्यांप्रमाणेच गोळा जिन्यावर चढवितात. ट्रायसेकलवर बसून उत्तमप्रकारें ट्रायसेकल-तीन चाकांची गाडी-चालवितात. जुनाट वाघ मात्र ट्रायसेकलवर बसत नाही. आज विशेषेकरून हत्तीच्या कसरतीविषयी माहिती सांगावयाची आहे. सिलोनांतील व मलबारांतील हत्ती लांकडे तोडतात; कापतात; ती वाहून नेतात; गलबतावर चढवितात; कार्यप्रयोजनांतील व उत्सवांतील स्वयंपाकाची मोठमोठी भांडी चढवितात व उतरतात. एकमेकांचे भक्ष्य पाळीपाळीने घेऊन येतात. कळपामधील मोरक्या हत्ती, सोंडेमध्ये झाडाची डहाळी घेऊन ती जमिनीवर ठोकून, हत्ती धरण्याचा खळगा वगैरे कोठे आहे त्याची सर्वांस सूचना करतो. हत्ती फार बुद्धिमान् आहे. शिकविलेला हत्ती एका पिपावर एका पायावर उभा राहून नाच करतो; सोंडेवर पीप नाचवितो; खाली डोके वर पाय करून उभा राहतो. तो आपले खाणे आणावयास खुणांनी सांगतो, व ते लोकर आणण्याविषयी विदूषकाला ओढतो. तो घांट वाजवून चाकराला हाका मारतो, आणि आपले खाणे आटोपलें कीं, सारी भांडी फेंकून देतो. चाकराच्या खिशांतील फळ चोरून घेतो. कित्येक हत्ती सोंडेमध्ये लेखण धरून अक्षरे काढतात. औरंगजेबाचा हत्ती आपल्या बादशहावर चौरी वारीत असे, व कुराणांतील पुष्कळ वाक्ये जमिनीवर लिहून दाखवी. खरे पाहिले तर, हत्ती हा आपल्या गुरूपेक्षा कितीतरा मोठा व बलाढ्य असतो. तथापि तो त्याची आज्ञा इतकी तत्परतेने पाळतो की, तसा शिष्य गुरूला मनुष्यांत सुद्धां सांपडणे कठीण ! ह्याचे नांव खरा क्षमाशील प्राणी! खाली डोके वर पाय करून कसरत करित असलेल्या हत्तीचे चित्र आज शिरोभागी दिले आहे. सीलचे चमत्कार ह्याहूनही विशेष असतात. ते आणखी एखादे वेळी सांगू.