या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. Jला काटकसर. SEPालीमा प्रकरण १ लें, उद्योग. "माझ्याजवळ आहे तें माझें राज्य नव्हे; तर मी जे काय करतों तें माझें राज्य." ___-कार्लाइल.-- Rधनोत्पादक उद्योग हेच काय ते भांडवल. त्यानेच लोक श्रीमंत होतात आणि राष्ट्राच्या भरभराटीची व कल्याणाची वृद्धि करण्यास तेच कारणीभूत होतें. सालोमन ह्मणतो, "कोणताही उद्योग घ्या; त्यांत नफा हा असावयाचाच." अर्थशास्त्र ह्मणजे तरी काय ? ह्याच वाक्याचें धुंदुक धुंदुक निरूपण नव्हे काय?" -साम्युएल लेंग"सृष्टीच्या अडचणी दूर करण्याकरितां परमेश्वर नांगांच्या श्रमानें, कारागिरांच्या कौशल्याने व कष्टानें, व्यापाऱ्यांच्या व्यापाराने व धाडसानें, जगांतील चांगल्या चांगल्या वस्तूंचा पुरवठा करतो............ आळशी मनुष्य मृतासारखा होय; तो जगाच्या अडचणी व फेरफार ह्यांविषयी बेफिकीर असतो. तो केवळ कालाचा व्यय करण्याकरतांच जगतो आणि पृथ्वीच्या फळांचा खाऊन फडशा पाडतो. असले लोक किड्याप्रमाणे किंवा लांडग्याप्रमाणे होत. त्यांचा काल आला ह्मणजे ते मरतात व धुळीस मिळतात. परंतु जन्मांत सत्कृत्य ह्मणून कसलें तें शपथेला सुद्धा करावयाचे नाहींत.” -जरेमी टेलर“आह्मी जी इमारत उभारतों आहों ती कालाची आहे. -लांग फेलोकर सुशिक्षितपणाबरोबरच काटकसरीचा प्रारंभ झाला आहे. उद्याची किंवा आजची काहीतरी तरतूद करणे भाग आहे, असें मनुष्यांस जेव्हांपासून वाढू लागले, तेव्हांपासूनच काटकसर उत्पन्न झाली आहे. पैशाच्याही पूर्वीचा जन्म तिचा. काटकसर झणजे खासगी व्यवस्था. हिच्यामध्ये घरची टापटीप, कुटुंबाची व्यवस्था व शिस्त ह्यांचा अंतर्भाव होतो.