या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. तसेंच व्यक्तिमात्राचे हित करणे व ते वाढविणे हे घरच्या काटक| सरीचे फल आहे. आणि राष्ट्राची संपत्ति मिळविणे व ती वाढविणे हे अर्थशास्त्राचे फल आहे. ) खासगी संपत्ति असो, की सार्वजनिक संपत्ति असो; त्या दोहोंचें मूळ एकच आहे. संपत्ति ही श्रमानें प्राप्त होते; काटकसर केल्याने आणि शिल्लक ठेवल्याने तिचे संरक्षण होते; आणि श्रमानें व दीर्घोद्योगाने ती वाढते. प्रत्येक राष्ट्राची संपत्ति-ह्मणजे पर्यायाने हित किंवा कल्याणच ह्मणावयाचें-वाढविणारी जी जी शिल्लक ती ती व्यक्तिमात्राचीच शिल्लक होय. दुसऱ्या पक्षी, व्यक्तिमात्राची उधळपट्टी, हीच राष्ट्राच्या दारिद्यास कारणीभूत होते. ह्यावरून प्रत्येक काटकसरी मनुष्य हा राष्ट्राचा हितकतो, आणि प्रत्येक उधळपट्या मनुष्य हा राष्ट्राचा शत्रु होय. घरगुती व्यवस्था नीट ठेवण्याच्या आवश्यकतेबद्दल मुळीच वाद ाही. ती गोष्ट प्रत्येक जण मान्य करतो आणि तिचें मंडणही पण करतो. परंतु अर्थशास्त्राची गोष्ट तशी नाही. कारण, त्या संबंधाने अनेक वाद उपस्थित होतात. उदाहरणार्थ-भांडवलाची वाटणी, मालमत्तेचा संग्रह, करांचा भार, भिकाऱ्यांचा कायदा, इत्यादि बाबी होत. पण त्यांत शिरण्याचे आमी मुळीच मनांत आणित नाहीं. 'काटकसरीची घरगुती व्यवस्था' एवढाच विषय ह्या ग्रंथाची सारी पानें भरून काढण्यास रग्गड झाला. काटकसर हा कांहीं स्वभावसिद्ध गुण नाही. तर वारंवार येणारे अनुभव, एकामागून एक लागणाऱ्या ठेचा आणि दूरवर विचार करण्याची संवय ह्यांची वाढ ती काटकसर होय. तो विद्येचा आणि बुद्धिमत्तेचा प्रभाव आहे. मनुष्ये जेव्हां शहाणी व विचारशील होतात, तव्हाच ती काटकसरी बनतात. ह्मणून स्त्रीपुरुषांना दूरदर्शी करण्याचे उत्तमोत्तम साधन झटलें ह्मणजे त्यांस शहाणी करणे हे होय. मनुष्याचा कल स्वभावतःच काटकसरीपणापेक्षां उधळपट्टीकडे विशेष आहे. रानटी मनुष्य अतिशय दिवाळखोर असतो. कारण, उद्यांचा किंवा पुढचा विचार ह्मणून त्याला कसला तो नसतो. सर्वात आधीं जो मनुष्य उत्पन्न झाला असेल, त्याने कांहीं संग्रह केला नव्हता. तो गुहेत