या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ - केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. किंवा झाडपाल्याने आच्छादलेल्या जमिनीच्या विवरांत रहात असावा. तो समुद्रकांठच्या शिंपा जमा करून त्यांतील कालवावर निर्वाह करीत असावा, किंवा जंगलांतील कंदमुळे, किंवा लहानसहान जीवजंतूंवर आपली उपजीविका चालवित असावा. तो दगडाने प्राण्याचे जीव घेत असला पाहिजे. तो त्यांच्यासाठी दबा धरून बसत असावा, किंवा पायांनींच पाठलाग करीत असावा. नंतर तो दगडांचा हत्याराप्रमाणे उपयोग करण्यास शिकला. बाणांची टोंके, व भाल्यांच्या अणकुच्या दगडांच्या करून तो आपले श्रम वांचवीत असावा, व त्यांच्या साह्याने पशुपक्षी फार त्वरित मारित असावा. मूळच्या रानटी लोकांस शेतकी मुळीच माहित नव्हती. त्याच्याहून जरा आलीकडच्या कालाचा विचार करून पाहिले तर, असे दिसते की, मनुष्ये ही खाण्याकरितां बी गोळा करीत आणि त्यांच्यांतील कांहीं थोडे दुसऱ्या वर्षीच्या पिकाकरितां राखून ठेवीत. खनिज पदार्थाचा शोध लागून त्यांना आंच देण्याची कल्पना निघाल्यानंतर आणि अशोधित धातूंच रस करून शुद्ध धातु तयार होऊ लागल्यानंतर मनुष्याची धांव पुष्कळच पुढे गेली. पुढे त्यांस तीक्ष्ण हत्यारे व दगडांची किंकरी करता येऊ लागली. घरे बांधतां येऊ लागली. अशा प्रकारे सुधारणेची अनेक साधने व कृति त्यांनी अव्याहत परिश्रमाने चालू केल्या. समुद्रकांठी राहणारांनी पडलेली झाडे जाळून ती पोखरली आणि त्यांची होडी घालून ते समुद्रांत जाऊ लागले, आणि खाण्याकरितां मासे धरूं लागले. पोखरलेली झाडे होती, त्यांनाच खिळे बसवून बोटी बनल्या. डोणकी, पडाव, गलबतें, वल्हीं वगैरे प्रकार झाले. होड्या, तारवें, वाफेच्या आगबोटी असे होता होतां साऱ्या जगभर वसाहती व सुधारणा फडकू लागली. पूर्वकालीन लोकांनी लोकोपयोगी श्रम केले नसते तर, मनुष्यप्राणी जशाचा तसा रानटी स्थितीतच राहिला असता. आपल्या पूर्वजांनी जमीन सुपीक करून ठेवली ह्मणून मनुष्यांच्या उपयोगाचे भक्ष्य त्यांत उत्पन्न होऊ लागले. त्यांनी हत्यारांचा व कापडांचा शोध लावला ह्मणून त्यांची गोड फळे आज आमांस उपभोगावयास मिळत. आहेत.