या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. १५३ त्यांनी शास्त्रे व कला उदयास आणल्या ह्मणून त्यांच्या परिश्रमाची आज आपणांस चीज करावयास मिळते. कोठेही पहा! एक वेळ चांगली घडून आलेली गोष्ट समूळ अशी कधींच नष्ट होत नाही, हा सृष्टीचा नियम आहे. आपल्या पूर्वीच ज्यांनी कामें करून यश संपादन करून ठेवले आहे, अशा लक्षावधी मृत मनुघ्यांचे सजीव मनुष्यांस वारंवार स्मरण होते. कधींच धुळीस मिळालेल्या निनवी, बाबिलोन, व ट्राय शहरांतील इमारतींत व खोदीव कामांत दृष्टिगोचर होणारे कौशल्य व कारागिरी परंपर्या आजमितीला आझापयेत येऊन पोचली आहे. विधात्याच्या अटोकाट बंदोबस्तामध्ये मनुष्याच्या श्रमाचा नष्टांश असा कधीच होत नाही. उपयुक्त कृत्यांतील अल्पांश जरी बाकी असला, आणि त्याचें फळ व्यक्तिमात्राला न मिळाले तरी, तो समाजाला सारखें देतच असतो. आमच्या पूर्वजांनी मृत्युपत्रांत आमांला जी जड संपत्ति ठेवलेली असते ती, आमच्या वारसाच्या हक्काने आह्मांस जी इतर संपत्ति मिळालली आहे तिच्या पुढे केवळ कःपदार्थ होय. आह्मांस जन्महक्काने जे जे मिळालेले आहे. ते ते तिच्याहन फार शाश्वतचे आहे. त्यात मानवी श्रमाच्या आणि कौशल्याच्या सर्व उपयुक्त फलांचा समावेश होता. ही फले शिकून मिळत नाहीत, तर उदाहरणाने आणि कृतीनेच प्राप्त होतात. एक पिढी दुसऱ्या पिढीला शिकवते. ह्याप्रमाणे कलाकौशल्य व यंत्रशास्त्रास लागणारे सामान व द्रव्ये ह्यांच्या ज्ञानाचा साठा कायम रहात जातो. अशा रीतीने पूर्वीच्या पिढीचे श्रम व उद्योग बापाकडून मुलाकडे जातात, आणि सुधारणेतील महत्वाच्या आयुधांपैकी अत्यंत महत्वाचे आयुध जी मनुष्यजातीची परंपरेने चालत आलेली ज्ञानभांडाररूपी मालमत्ता तीच ते होऊन बसतात. ह्यावरून आमच्या पूर्वजांच्या श्रमांची उपयुक्त फलें, ही आमच्या जन्महक्कानेंच आझांस प्राप्त झालेली आहेत. पण त्यांच्या उद्योगांतील आमचा वाटा आह्मीं उचलल्याशिवाय, त्यांचा आझांस उपभोग घेतां येत नाही. हाताने ह्मणा की डोक्याने ह्मणा-अर्थात् शारीरिक किंवा मानसिक-काम हे सर्वांनी केलेच पाहिजे. उद्योगाशिवाय सारा जन्म व्यर्थ आहे. अशी स्थिति ह्मणजे एक प्रकारची मानसिक झापडच समजली वा श्रमाच्या आणि काहीत, तर उदाहरणा. ह्याप्रमा २०