या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. पाहिजे. आमचे ह्मणणे केवळ शारीरिक श्रमाविषयींच आहे असें नाहीं. कोणतेही कृत्य करणे, व त्यांत टिकाव धरणे, सारासार विचार करणे, शांति धरणे, जोखम आंगावर घेणे व भूतदया प्रगट करणें, उन्नत्यर्थ झंटणे व सत्याचा प्रसार करणे, अनाथांच्या दुःखाचा परिहार करून त्यांचे संगोपन करणे, दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याचा त्यांस प्रसंग येऊ नये, अशा प्रकारे दीन दुबळ्यांस आश्रय देणे इत्यादि उच्चप्रतीची-मानसिक कामें अनेक आहेत. नब्यारो ह्मणतो “एखाद्या मोठ्या कोठारांतील धान्य एखाद्या किड्याने चोरावें; किंवा एखाद्या नक्राने लहान लहान माशांवर ताव द्यावा; त्याप्रमाणे उदार महात्म्याला दुसऱ्याच्या श्रमावर पंक्तिपठाण होऊन बसणे निखालस आवडणार नाही. इतकेच नव्हे, तर तो जनाची सेवा व कल्याण इतकें करील की, त्याच्या संबंधाने लोकांनी केलेले उपकार फिटून त्याचे श्रम कितीतरी शिल्लक राहतील. कारण, राजाच्या तरवारीपासून तो नांगऱ्याच्या कुदळीपर्यंत असा कोणताच धंदा नाहीं की, त्याची ठाकठीक लावावयाला, त्यांत हवेंतसे यश मिळवावयाला, त्यांत प्रावीण्य संपादन करावयाला, व त्यापासून आनंद उत्पन्न व्हावयाला, शारीरिक, मानसिक किंवा दोन्हीही श्रमांची अत्यंत आवश्यकता लागत नाही. श्रम हा केवळ आवश्यक आहे येवढेच नव्हे, तर तो उलटा आनंदच आहे. आमच्या शरिराची रचनाच अशी आहे की, तीमुळे श्रम हे सुखप्रद होतात, नाहीतर ते कष्टप्रद झाले असते. आमचा जीव कित्येक बाबतीमध्ये सृष्टीबरोबर झुंज खेळत असतो. पण तसाच तो दुसऱ्या कितीएक बाबतींमध्ये तिला साह्यही करीत असतो. सूर्य, हवा, आणि पृथ्वी हा नेहमी एकसारखी आमच्या प्राणतत्त्वांतन जीवनशक्ति काढून घेत असतात. ह्मणूनच आपणांस पुष्टि येण्यासाठी खावे लागते, व ऊब येण्यासाठी वस्त्रप्रावरणे घ्यावी लागतात. सृष्टि आमच्या बरोबरीने कामही करित असते. आह्मी नांगरतों त्या मृत्तिकेचा ती पुरवठा करते. आही जे बी पेरतों व गोळा करतो, ते ती वाढविते व पिकविते. आमी जे अन्न खातों, व जी लोंकर विणतो, त्यांचा ती मनुष्यांच्या श्रमाच्या द्वारे पुरवठा करते. ह्मणून आह्मी श्रीमंत असलो किंवा गरिब असलो तरी आमी जे जे काय खातों, जी