या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. १६५ जी वस्त्रप्रावरणे वापरतों, राजमंदिरापासून तो झोंपड्यापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यापासून आझांला निवारा मिळतो, तें तें सर्व श्रमाचे फळ आहे, ही गोष्ट आपणांस विसरता कामा नये. सर्वांच्या उपजीविका चालविण्यामध्ये मनुष्ये परस्परांस साह्य करीत असतात. शेतकरी जमिनीची मेहनत मशागत करून अन्नाचा पुरवठा करतो. कोष्टी कापड विणतो, आणि शिंपी व शिवणारणी त्यांचे कपडे तयार करतात. गवंडी आणि पाथरवट घर बांधतात. आणि त्यांत राहून आह्मी गृहसौख्याचा उपभोग घेतो. अशा रीतीनें कैक कारागीर सार्वजनिक हित करण्याकरतां खपत असतात. कितीही क्षुद्र गोष्टी असोत, त्या श्रम आणि चातुर्य ह्यांच्या योगाने अतिशय मूल्यवान् पदास चढतात. श्रम हा खरोखर मनुष्यजातीचा प्राण आहे. तो सोडून दिला; त्याला हद्दपार केला; तर हा मनुष्याचा सारा वंश मृत्युमुखी पडलाच ह्मणून समजावें. सेंटपॉलने झटले आहे "जो काम करणार नाही, त्याला खावयालाही मिळणार नाही.” आणि खकष्टार्जित संपादन करून त्याचा उपभोग घेण्यांत व दुसऱ्या कोणावरही अवलंबून न रहाण्यांतच त्या महात्म्याला मनखी भूषण वाटत असते. एका शेतकऱ्याची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. तो अगदीं मरणोन्मुख हाऊन पडला असतां, आपल्या आळशी मुलांस कांहीं महत्वाचा कानमत्र सांगावा ह्मणून त्याने त्यांस आपल्या जवळ बोलावले. आणि ह्मणाला, "माझ्या लाडक्यांनो! आपल्या जमिनींमध्ये एक मोठी गुप्त ठेव ठवलली आज मी तुमच्या खाधीन करणार आहे." इतकें ह्मणतो तो त्या माता-याला दम लागला. सारी मुले एकदम ओरडून विचारूं लागली, "कोठेशी पुरलेली आहे ?" मातारा मनुष्य ह्मणाला, "तें मी तुमाला सांगणारच होतो. तुझी ती खणून पाहिली पाहिजे........" परंतु ह्या ठेवीचे ठिकाण सांगण्यापूर्वीच त्याचा जीव पुन्हा घाबरा झाला. आणि लगेच प्राणोत्क्रमण झाले. तेव्हां लागलंच कित्येक दिवसांत ज्यांनी शेताकडे ढुंकून सुद्धा पाहिले नव्हते, त्या मुलग्यांनी खोरी, कुदळी घेऊन ती शेतें उकरण्यास प्रारंभ केला. आणि त्या जमिनीतील सारें ढेकूळ ना ढेकूळ व ढुमस ना ढुमस उचटून काढले. त्यांत त्यांना ठेव तर सांपडली नाहींच, पण त्यांना काम करण्याची संवय लागली.