या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. आणि त्या यथास्थित मेहनत केलेल्या जमिनीत जेव्हां बी टाकले, आणि सुगीचे दिवस येऊन ठेपले, तेव्हां चमत्कार पहा! त्याची नांगरट यथायोग्य झाल्यामुळे तींत बेसुमार उत्पन्न झाले. आणि त्यांच्या त्या वृद्ध व चतुर बापाने त्यांना ज्या ठेवीबद्दल लालुच दाखविली होती, ती गुप्त ठेव अशा रीतीने त्या जमिनीतच असलेली त्यांच्या हाती आली. - श्रम हे जसे ओझ्यासारखे व शिक्षेसारखे आहेत तसेच ते सन्मानदायक व आनंददायकही आहेत. कष्ट हे दारिद्यस्वरूपच आहेत हे खरे, पण त्यांतही एकप्रकारची प्रतिष्ठा असते. श्रम हे आपल्या स्वाभाविक व कृत्रिम (समाजरचनेवरून प्राप्त झालेल्या) गरजांचे दर्शक होत. श्रमाशिवाय मनुष्य कसला? श्रमाशिवाय जन्म कसला? व श्रमाशिवाय सुधारणा तरी कसली? मोठेपणा ह्मणून जो काय आहे, तो मनुष्याला श्रमानेच प्राप्त होतो. कलाकौशल्यांत हातखंडा; विद्युत प्रावीण्य; शास्त्रांत नैपुण्य; व ज्याच्या पंखाने स्वर्गात सुद्धां भरारी मारतां येते तें ज्ञान; ही सर्व एका श्रमाने हस्तगत होतात. बुद्धिमत्ता हीही एक शक्ति आहे. तिच्या योगाने सतत श्रम करतां येतात. तिच्या योगाने मनुष्याला थोरपणा व प्रयनाला पाठिंबा मिळतो. श्रम हे शिक्षेसारखेही वाटतात हे खरे, पण ती शिक्षा मोठी प्रतिष्ठित व सन्मानदायक समजली पाहिजे. पूज्यता, कर्तव्य, स्तुति आणि चिरस्थायित्व हीं कोणाकरितां आहेत ? तर जे कोणी सत्कर्माचा अत्युच्च हेतु धरून श्रम करतात, त्यांच्याकरितांच आहेत.। ईश्वरी इच्छेस मान देण्याकरितांच त्याचे नियम पाळले पाहिजेत असे नाही, तर बुद्धीची वृद्धि करण्याकरितां, व आपल्या जातिस्वभावाची हौस फिटण्याकरितां आपल्याला श्रम हे केलेच पाहिजेत. ह्या गोष्टीचा विचार न करितां पुष्कळ लोक, ईश्वराने आमांस जो नियम लावून दिला आहे त्याविषयी कुरकुर व तिरस्कार करतात. खरोखर दुःखी कष्टी ह्मणून जेवढी मनुष्ये आहेत, त्यांत आळशाइतकी दुःखी कष्टी कोणी नाहीत. त्यांच्या जवळ हिताची कल्पना ह्मणून कसली ती नसतेच; व इंद्रियांना खुष करण्यापलीकडे त्यांना काही कर्तव्य आहे असे वाटतच नाही. असले मनुष्य झणजे अतिशय किरकिरे, रडत्कल्याणी, अधाशांतले अधाशी, सदासर्वदां त्रासलेले, खतःच्याही कामाचे नव्हेत ,